kdmc

कल्याण : चाळकऱ्यांचे पाणी वळवून मोठ्या गृह संकुलास देण्याच्या प्रकारावर माजी नगरसेवकाने आंदोलनाचा इशारा देताच याबाबत कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी त्वरित कार्यवाही आश्वासन दिले आहे.

कल्याण पूर्वेतील गणेश वाडी(ganeshwadi) प्रभागातील शक्ती धाममधील नवीन गृहसंकुलास बाजूच्या प्रभाग असलेल्या कोळसेवाडी विकासनगर पाण्याच्या टाकीतून जलवाहिनी टाकण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली. कोरोनाच्या काळात कोणाचे लक्ष नसल्याने जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात केली. या जलवाहिनीमुळे परिसरात अधिकच पाणीटंचाई समस्या भेडसावणार असल्याने जलवाहिनी टाकण्याच्या कामाला येथील स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी विरोध केला.

पालिकेच्या पाणीपुरवठा विभाग कोळसेवाडी परिसरातील गणेशवाडी प्रभागातील शक्ती धाममधील नवीन गृहसंकुलास मोठी जलवाहीनी टाकण्यासाठी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने मंजुरी दिल्याने या परिसारातील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. यामुळे जलवाहिनी टाकण्याचे काम त्वरित थाबविण्यासाठी माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी पालिका आयुक्त व पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्याकडे पत्रव्यवहार केला होता. पालिका आयुक्तांना रसाळ यांनी या जलवाहिनी मुळे नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची सत्य परिस्थिती मांडल्याने अखेरीस पालिका आयुक्तांनी जलवाहिनी टाकण्याच्या कामाची चौकशी करून कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याचे उदय रसाळ यांनी सांगितले.