kdmc majhe kutumb majhi jababdari posteron rickshaw

कल्याण डोंबिवलीमध्ये (kalyan dombivali)  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालिकाक्षेत्र कोरोनामुक्त करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी(majhe kutumb majhi jabadari) अभियान सुरु असून याची जनजागृती करण्यासाठी आता महानगरपालिकेने रिक्षांचा आधार घेतला असून रिक्षांवर स्टीकर आणि पोस्टर लावून (sticker and poster on rickshaw)नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये (kalyan dombivali)  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पालिकाक्षेत्र कोरोनामुक्त करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी(majhe kutumb majhi jabadari) अभियान सुरु असून याची जनजागृती करण्यासाठी आता महानगरपालिकेने रिक्षांचा आधार घेतला असून रिक्षांवर स्टीकर आणि पोस्टर लावून (sticker and poster on rickshaw)नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. आज पालिका मुख्यालयात काही रिक्षांवर हे स्टीकर आणि पोस्टर लावण्यात आले. तर रिक्षातून प्रवास करताना विनामास्क व्यक्तीला रिक्षामध्ये प्रवेश देण्यात येणार नसल्याचे पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

प्रत्येक रिक्षावर माझे कुटुंब माझी जवाबदारी या उपक्रमाच्या सूचना रिक्षाच्या मागे आणि रिक्षात देखील स्टीकरच्या माध्यमातून लावण्यात आल्या असून मास्क लावल्याशिवाय प्रवाशांना रिक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय रिक्षा संघटनेने घेतला असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

साडेपाच हजार स्टीकर बनविण्यात आले असून ते साडेपाच हजार रिक्षांमध्ये लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या रिक्षा केवळ कल्याण डोंबिवली शहरात फिरणार नसून बदलापूर, ठाणे नवीमुंबई अशा सर्व ठिकाणी जात असतात. त्यामुळे या शहरात देखील या उपक्रमाची जनजागृती होणार असल्याची माहिती कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष तथा सभागृहनेते प्रकाश पेणकर यांनी दिली.