mask

कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार, महापालिका प्रभागक्षेत्र अधिकारी यांचे पथकांनी पोलीसांच्‍या सहकार्याने, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तींविरुध्द दंडनीय कारवाई करून मंगळवारी १,१३,५०० रुपये दंड वसूली(fine collection) केली.

डोंबिवली : कल्याण डोंबिवली(kalyan dombivali) महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार, महापालिका प्रभागक्षेत्र अधिकारी यांचे पथकांनी पोलीसांच्‍या सहकार्याने, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क परिधान न करणाऱ्या व्यक्तींविरुध्द दंडनीय कारवाई करून मंगळवारी १,१३,५०० रुपये दंड वसूली(fine collection) केली.

पालिकेच्या या मोहिमे अंतर्गत मंगळवारी दिवसभरात मास्क परिधान न केलेल्या व्यक्तींकडून, प्रभाग निहाय अ प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये १,५००/-, ब प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये ७,५००/-, क प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये २१,०००/-, जे प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये ८,५००,/-, ड प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये १०,५००/- फ प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये१७,०००/- ह प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये ४,५००/-, ग प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये २१,०००/-, आय प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये ४,०००/- आणि ई प्रभागक्षेत्रातून रक्कम रुपये १८,०००/- असा एकूण २२७ नागरिकांकडून रक्‍कम रुपये १,१३,५०० इतका दंड वसूल करण्‍यात आला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना आपल्‍या चेहऱ्यावर मास्‍क व कापड परिधान करावे, तसेच महापालिका क्षेत्रातील दुकानदारांनी सायंकाळी ७.०० वाजता दुकाने बंद करुन महापालिकेला सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्‍यात येत आहे.