कल्याण डोंबिवली पालिका झाली मालामाल, गेल्या ४९ दिवसांत ‘इतकी’ जमा झाली मालमत्ता कराची रक्कम

कल्याण डोंबिवली महापालिकेने(kalyan dombivali corporation) मालमत्ता कर(property tax) थकबाकीदारासाठी अभय योजना १५ ऑक्टोबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत सुरु केली आहे. यंदा अवघ्या ४९दिवसात मालमत्ता करांच्या पोटी ६०कोटी रूपयांचा नागरिकांनी भरणा केल्याने मनपाच्या तिजोरीत भर पडली आहे.

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने(kayan dombivali corporation) मालमत्ता कर(property tax) थकबाकीदारासाठी अभय योजना १५ ऑक्टोबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत सुरु केली आहे. गत वर्षीच्या १५ ऑक्टोबर ते ४ डिसेंबर तुलनेत यंदा १५ ऑक्टोबर ते ४ डिसेंबरपर्यंत तब्बल ३३ कोटी रूपये जास्त वसुली झाल्याने अभय योजनाला(abhay scheme) मालमत्ता कर थकबाकीदारांनी चागंला प्रतिसाद देत असल्याचे दिसून आले. यंदा अवघ्या ४९दिवसात मालमत्ता करांच्या पोटी ६०कोटी रूपयांचा नागरिकांनी भरणा केल्याने मनपाच्या तिजोरीत भर पडली आहे.

मनपाच्या आर्थिक गाड्याला चलना मिळाली आहे. कोविड- १९ साथीच्या बिकट परिस्थितीत महापालिकेच्या थकित करदात्यांना कर भरणे सुलभ व्हावे याकरिता महापालिकेने १५ ऑक्टोबर २०२० ते ३१ डिसेंबर, २०२० या कालावधीमध्ये अभय योजना-२०२० लागू केली आणि या अभय योजनेस महापालिकेच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अभय योजनेअंतर्गत १५ ऑक्टोबर २०२० ते ४ डिसेंबर २०२० या कालावधीत तब्बल ६० कोटींचा रूपये भरणा करदात्या नागरिकांनी महापालिकेच्या तिजोरीत केला आहे.गेल्या वर्षी याच कालावधीत(१५ ऑक्टोबर ते ४ डिसेंबर) २७ कोटींचा रुपये भरणा नागरीकांनी महापालिकेत केला होता. या योजनेमध्ये संपूर्ण थकबाकीसह चालू वर्षाच्या कराची संपूर्ण रक्कम तसेच व्याजाची २५ टक्के रक्कम एक रक्‍कमी भरल्यास ७५ टक्के व्याज माफ केले जाणार आहे.

सर्व थकीत करदात्यांनी कराची रक्कम ३१ डिसेंबर, २०२० वा त्यापूर्वी जमा करुन अभय योजनेचा लाभ घ्यावा व महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.