kalyan dombivali municipal corporation collected 3 tons of old clothes under dry waste campaign nrvb

महापालिका परिसर अधिकाधिक सुंदर आणि स्वच्छ रहावा याकरिता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली २५ मे २०२०पासून महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या शून्य कचरा मोहीमेअंतर्गत दर रविवारी सुका कचरा संकलन मोहीम राबविण्यात येत आहे.

कल्याण :- मनपाने शुन्य कचरा मोहीम ची प्रभावीपणे अमंलबजावणी सुरू केले असुन आतापर्यंत सुकाकचरा मोहिमेअंतर्गत ८टन जुने कपडे संकलित करून महिला बचत गटांना रोजगाराचे माध्यम जुन्या कापडापासून माफक दरात पिशव्या तयार करून विक्री करीत पाँलिस्टिक पिशव्याबंदीला पर्याय उपलब्ध केला आहे.

महापालिका परिसर अधिकाधिक सुंदर आणि स्वच्छ रहावा याकरिता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली २५ मे २०२०पासून महापालिका क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या शून्य कचरा मोहीमेअंतर्गत दर रविवारी सुका कचरा संकलन मोहीम राबविण्यात येत आहे.

यामध्ये प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कापड,गादया, जुने कपडे संकलित करण्यात येतात,गेल्या महिन्याच्या दुसऱ्या रविवारी सिद्धी वेस्ट टू ग्रीन या संस्थेच्या मदतीने ४ टन कपडे महापालिकेकडे संकलित झाले होते. आताही या मोहिमेला नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला असून रविवारी सुमारे ३ टन कपडे महापालिकेकडे संकलित झाले आहेत.

या संकलित कपड्यांपासून महिला बचत गटाच्या माध्यमातून शिवण्यात आलेल्या कापडी पिशव्यांना देखील दुकानदार ,व्यापारी व नागरिक यांचेकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून प्रति पिशवी ५ रू या नाममात्र दराने कापडी पिशव्या शिवून बाजारात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

महापालिकेची शून्य कचरा मोहीम यशस्वी होण्यासाठी तसेच प्लास्टिकला आळा घालून पर्यायाने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून आणि रामदास कोकरे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) यांच्या प्रयत्नातून साकारलेला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे.