Stolen laptop sold to young man in shackles; Bharti University Police action

लॉकडाऊनच्या काळात डोंबिवली आणि कल्याणमध्ये(kalyan dombivali) कार्यालये तोडून लॅपटॉप चोरीच्या(laptol theft in kalyan dombivali) घटनांमध्ये वाढ झाली होती. लॅॅपटॉप चोरणाऱ्या या चोरट्याने मास्क घातल्याने त्याची ओळख पटत नव्हती. पोलीसही त्याचा शोध घेऊन चक्रावले होते. मात्र डान्स अकादमीमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज डान्स टिचरने व्हायरल केले. या व्हायरल पोस्टमुळे चोरटा पोलिसांच्या हाती लागला.

डोंबिवली : लॉकडाऊनच्या काळात डोंबिवली आणि कल्याणमध्ये(kalyan dombivali) कार्यालये तोडून लॅपटॉप चोरीच्या(laptol theft in kalyan dombivali) घटनांमध्ये वाढ झाली होती. अज्ञात व्यक्तीकडून होत असलेल्या या गुन्ह्यामुळे पोलीसही हादरुन गेले होते. मात्र, एका छोट्याश्या क्ल्यूमुळे अखेर पोलिसांना या आरोपीपर्यंत पोहोचणं शक्य झालं असून त्याला बेड्या घालण्यात आल्या आहेत.

लॅॅपटॉप चोरणाऱ्या या चोरट्याने मास्क घातल्याने त्याची ओळख पटत नव्हती. पोलीसही त्याचा शोध घेऊन चक्रावले होते. मात्र डान्स अकादमीमध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याचे सीसीटीव्ही फुटेज डान्स टिचरने व्हायरल केले. या व्हायरल पोस्टमुळे चोरटा पोलिसांच्या हाती लागला. याच्याकडून १० लॅपटॉप हस्तगत करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हा चोरटा वांगणीहून पहाटेच्या ट्रेनने डोंबिवलीत यायचा. लॉकडाऊनच्या काळात पहाटे चोरी करून निघून जायचा.

या चोरट्याचा चोरी करतानाचे एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हातात होते. मात्र, चोरट्याने मास्क घातल्याने त्याची ओळख स्पष्टपणे पटत नव्हती. या दरम्यान, डान्स अकादमी चालविणारे योगेश पाटकर त्यांच्या अकादमीमधून ज्या चोरट्याने प्रोजेक्टर चोरी केला होता. त्याचे सीसीटीव्ही फुटेज कल्याण-डोंबिवलीतील त्यांच्या फ्रेंड्स ग्रुपवर शेअर केले आणि फेसबुक पोस्टही टाकली. या फेसबुक पोस्टवरुन चोरटा पोलिसांच्या हाती लागला.

ती फेसबुक पोस्ट एका तरुणाने बघितली. हा तरुण योगेश पाटकर यांच्या संपर्कात आला. ज्या व्यक्तीची पोस्ट तुम्ही टाकली आहे. तो माझा मित्र आहे. त्याला मी चांगलेच ओळखतो असं त्यांनी योगेश पाटकर यांना सांगितले. पाटकर यांनी पोलिसांशी संपर्क साधला. चोराचा पत्ता सांगणाऱ्या व्यक्तीला पाटकर यांनी दहा हजार रुपये बक्षीस देणार असल्याचं सांगितलं होते. त्यानुसार, पाटकर त्या व्यक्तिला १० हजार रुपये बक्षीस म्हणून देणार आहेत.

कल्याण क्राईम ब्रॅन्चचे पोलीस अधिकारी नितीन मुकदूम यांनी तातडीने सापळा रचून चोरट्याला ताब्यात घेतलं. रोशन जाधव असं या तरुणाचे नाव असून तो डिसेंबर २०१९ मध्ये जेलमधून सुटून आला होता. वांगणीला राहणारा रोशन हा ट्रेन सुरु झाल्यावर दररोज पहाटे पाच वाजताच्या सुमारास डोंबिवली गाठायचा. सकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान चोरी करुन निघून जायचा. त्याच्याकडून सहा गुन्हे उघडकीस आले आहेत. दहा लॅपटॉप आणि दोन प्रोजेक्टर हस्तगत करण्यात आले आहे. आणखीन काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.