केंद्रीय आरोग्य पथकाकडून कल्याण डोंबिवलीचा पाहणी दौरा

कल्याण :कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील केंद्रीय आरोग्य पथकाने नुकताच कल्याण डोंबिवलीचा पाहणी दौरा केला. कोरोना रोखण्यासाठी आणि रुग्णांसाठी महापालिका

कल्याण :कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील केंद्रीय आरोग्य पथकाने नुकताच कल्याण डोंबिवलीचा पाहणी दौरा केला. कोरोना रोखण्यासाठी आणि रुग्णांसाठी महापालिका प्रशासनातर्फे कल्याण डोंबिवलीत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला. या केंद्रीय पथकाने डोंबिवलीतील मढवी नागरी आरोग्य केंद्राला भेट देत तिथल्या कामाची, महापालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या उपाययोजना, केले जाणारे सर्वेक्षण आदींची सखोल माहिती घेतली. तसेच कोरोना कंटेंनमेंट झोन असणाऱ्या साईनाथवाडी म्हात्रे नगर येथे प्रत्यक्ष भेट देत सर्वे करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यामध्ये आणखी काय सुधारणा केल्या पाहिजे याबाबत सूचनाही दिल्या. तर कल्याण डोंबिवलीत येण्यापूर्वी त्यांनी भिवंडी बायपास टाटा आमंत्रा येथील कोवीड सेंटरची पाहणी करून समाधान व्यक्त केल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी राजू लवांगरे यांनी दिली. दरम्यान डोंबिवलीतील महापालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय हे डेडिकेटेड कोव्हिड रुग्णालय करण्याच्या सूचनाही या केंद्रीय पथकाने दिल्या आहेत.