चालता येत नसल्याने वृद्ध कोरोना संशयित इमारतीच्या जिन्यावरून सरपटत उतरले खाली, रुग्णवाहीका तोपर्यंत गेली निघून ?

कल्याण : कल्याण डोंबिवलीत एका कोरोना संशयित रूगणाला रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने चालत रूग्णालयात जाण्याची वेळ आल्याची घटना चर्चेत असताना मनपा आरोग्य प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे एका वृद्ध

 कल्याण : कल्याण डोंबिवलीत एका कोरोना संशयित रूगणाला रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने चालत रूग्णालयात जाण्याची वेळ आल्याची घटना चर्चेत असताना मनपा आरोग्य प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे एका वृद्ध दाम्पत्याला राहत असलेल्या चौथ्या मजल्यावरून सरपटत जिना खाली उतरण्याची  प्रशासकीय  सावाळा गोंधळ कारभारामुळे आली. हे कमी की काय म्हणून प्रशासकीय यंत्रणाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे या हायरिस्क कॉन्टॅक्ट संशयित वृध्दांना रूग्णालयात नेण्यासाठी आलेल्या रूग्णवाहिकेने त्या वृद्धांना न नेताच पोबारा केल्याने मानवता या महामारीत लोप होत असल्याचे व प्रशासनाच्या   नियोजनाचा अभाव व समन्वय कारभाराचे पितळ या घटनेमुळे उघडे पडत असल्याचे आरोप होत आहे.                       

कल्याण पुर्वेतील ७१ वर्षीय वृद्धाला व त्यांच्या वृध्द पत्नीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून जिन्यातुन सरपटत येण्याची वेळ शनिवारी आली.  मन हेलावून टाकणारी घटनेत वृद्ध दांपत्य जिन्यातुन सरपटत खाली आल्यानंतर त्यांना घेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका निघून गेली होती. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना पाहून मन हेलावून  टाकणारी आहे.  कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने कोरोना महामारीसाठी केलेल्या उपाययोजना  व आरोग्य विभागाच्या नियोजन शुन्य गलथान कारभारामुळे मनपा कोरोना रुग्णांची किती काळजी घेते, असा प्रश्न यानिमित्ताने उभा राहिला आहे.                    सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार,कल्याण पुर्वेतील हनुमाननगरातील एका चार मजली इमारतीत राहणारे  ७१ वर्षीय वडील व आई हे दोघे कोरोना संशयित रुग्ण आहेत. त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी त्यांच्या मुलांनी फोन केला. या दोन्ही वृद्धांना घेण्यासाठी रुग्णवाहिका सोसायटीच्या दारात आली. दरम्यान या दोन्ही वयोवृद्धांना चालण्याचा त्रास असल्याने ते दोघेही चौथ्या मजल्यावरुन सरपटत खाली आले. ते खाली आल्यावर त्यांना घेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका निघून गेली होती. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओची सत्यता तापसणे गरजेचे आहे. प्रशासन कोरोनाविषयक उपाययोजना राबवित आहे. अशा घटनेमुळे प्रशासानने खमकी भुमिका घेत प्रशासकीय यंत्रणा सक्षम व योग्य नियोजन ,यंत्रणा, आरोग्य विभाग समन्वय साधुन प्रशासकीय यंत्रणा , गतिमान करीत कोवीड -१९  उपाययोजना  प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे.

 मनपा  प्रशासनाच्या मते, कल्‍याण पूर्वेतील तिसगांव परिसरातील हायरिक्‍स कॉन्‍टॅक्‍ट असलेल्‍या रूग्‍णांना आणायला मनपाची रूग्‍णवाहिका काल रात्री गेली असता सदर इमारत चार मजल्‍यांची असून संबंधित वृध्‍द नागरीक यांना चौथ्या मजल्यावरून उतरायला वेळ लागत असल्‍याने रुग्णवाहिकेचा चालक त्याची उपवास सोडायची वेळ झाल्याने निघून गेला. सदर वेळेस त्‍या वृध्‍द नागरीकांना चौथ्‍या मजल्‍यांवर खुर्चीतून वा स्ट्रेचर वरून  खालीआणण्‍यासाठी प्रत्‍यक्षदर्शींनी महापालिकेच्‍या कर्मचाऱ्यांना मदत केली नाही.  तथापि संबंधित नागरी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी  यांनी त्‍वरीत १० मिनिटांच्‍या आतच दुसरी रूग्‍णवाहिका संबंधित ठिकाणी पाठविली. त्‍या  रूग्‍णांना रूग्‍णालयात दाखल करून घेण्‍यात आले आहे. तर या घटने निमित्ताने पी.एम्.टी.च्या धर्तीवर  के डी.एम्. टी. चालकांची मदत घेत रुग्णवाहिका सेवा सक्षम करून कोरोना संशयितासाठी रूग्णवाहिका सेवा अपडेट करावी, अशी मागणी होत आहे.