कोरोनावर मात केलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे रहिवाशांनी टाळ्या वाजवून केले स्वागत

कल्याण : बिर्ला कॉलेज प्रभागातील रहिवाशी व कर्तव्यावर कार्यरत असलेले मुंबई येथील सर जे.जे.मार्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या आईला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.

 कल्याण : बिर्ला कॉलेज प्रभागातील रहिवाशी व कर्तव्यावर कार्यरत असलेले मुंबई येथील सर जे.जे.मार्ग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या आईला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर यशस्वीपणे मात करत ते अधिकारी उपचारानंतर पूर्णपणे बरे होऊन मंगळवारी घरी परतले. यावेळी संकुलातील सर्व रहिवाशांनी सोशल डिस्टन्स ठेवुन टाळ्या वाजवून, फुले उधळुन त्यांचे स्वागत स्वागत केले. याप्रसंगी शिवसेना उपशहर प्रमुख माजी नगरसेवक रवि पाटील, स्थानिक शिवसेनेच्या नगरसेविका छाया वाघमारे, सुकंलाचे अध्यक्ष रविंद्र पाटील, संकुलातील रहिवाशी, प्रभागातील  शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्या अधिकाऱ्यांची आईदेखील कोरोनावर मात करून परतणार असल्याचा खंबीर विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.