मयुर पाटील यांनी सोडविला शहरी भागातील शेतकऱ्यांच्या भात बियाण्यांचा प्रश्न

कल्याण : शहरी भागातील शेतकऱ्यांना अनुदानित भात बियाणे प्राप्त न झाल्याने शहरी भागातील शेतकऱ्यांना भात बियाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली असताना या बाबत कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य मयुर

 कल्याण :  शहरी भागातील शेतकऱ्यांना अनुदानित भात बियाणे प्राप्त न झाल्याने शहरी भागातील शेतकऱ्यांना भात बियाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली असताना या बाबत कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य मयुर पाटील यांनी हा विषय कृषी उत्पन्न बाजार समिती बैठकीत तातडीचा विषय सादर करून शहरी भागातील शेतकऱ्यांच्या बियाणे प्रश्नाबाबत प्रशासनाला धारेवर धरले. पुढील वर्षी सरसकट शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून बियाणे वाटप करण्याबाबतचे नियोजन करण्याचा ठराव मांडण्यात आला. 

कल्याण तालुक्यातील कृषी विभागा अंतर्गत येणारी ७० गावे तसेच मनपा क्षेत्रातील ५५ गावे अशा १२५ गावांमधील  सुमारे ५,२९०हेक्टर क्षेत्र भात पिकाखाली लागवडीसाठी असुन १४०००शेतकरी खातेदार संख्या असुनदेखील या शेतकऱ्यांच्या अनुदानित भात बियाणे प्रश्न कृषी उत्पन्न बाजार समिती माध्यमातून सोडवत खातेदार शेतकऱ्यांना अनुदानित भात बियाणे पुरविण्याबाबत आग्रही भुमिका कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य मयुर पाटील यांनी बैठकी दरम्यान घेतली. मयुर पाटील यांनी शहरी भागातील बल्याणी गटातील जे शेतकरी भात बियाण्यांपासून वंचित होते. ज्या शेतकऱ्यांनी भात बियाण्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला अशा  वंचित ५० शेतकऱ्यांच्या  गवात जात सोशल डिस्टन चे नियम पाळीत जोरदार, वायसर, पुजा, ओम जय श्री राम,या वाणाचे भात बियाण्यांचे मोफत वाटप करीत बल्याणी गटातील शहरी शेतकऱ्यांना कोरोनाच्या संकट समयी दिलासा दिला आहे. मयुर पाटील यांनी सांगितले की, वाढत्या शहरीकरणात देखील माझा शेतकरी बांधव आपला पारंपरिक शेती व्यवसाय टिकवून शेती करीत आहे. आशा शहरी भागातील शेतकऱ्यांना देखील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे. शेती टिकली तरच स्थानिक भुमीपूत्र  शेतकरी टिकेल.