निधी मंजूर होतात होर्डिंग लागतात, पण प्रत्यक्षात कल्याण-शीळ रोडच्या कामाला सुरुवात कधी? राजू पाटील यांची शिवसेनेवर टीका

कल्याण शीळ रस्त्याच्या (Kalyan-Sheel Road) कामाच्या दर्जाबाबत प्रशचिन्ह उपस्थित होत असून याबाबत बोलताना आमदार पाटील (MLA Raju Patil) यांनी या रस्त्याचे काम दर्जाहीन असल्याबाबत अनेकदा तक्रारी केल्या

  • कल्याण-शीळ रस्त्याच्या कामाची आमदार राजू पाटील यांच्याकडून पाहणी

कल्याण : कल्याण-शीळ रस्त्याच्या (Kalyan-Sheel Road) काँक्रिटीकरणाच्या (Concretization) कामाची आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांनी एमएसआरडीसी (MSRDC) अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी पलावा ते सुयोग हॉटेल चौकात (Palava to Suyog Hotel Chowk) होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी राजू पाटील यांनी वाहतूक कोंडीला (Traffic Jam) कारणीभूत असणाऱ्या समस्यांवर उपाय योजना करण्याच्या सूचना आपण यावेळी एमएसआरडीसी अधिकारी आणि वाहतूक पोलिसांना (Traffic Police) केल्याचे सांगितले.

एमएमआरडीएने रस्त्यासाठी मंजूर केलेल्या ३६० कोटीच्या निधी बाबत नुसत्या निधीच्या मंजुऱ्या येतात, होर्डिंग्ज लागतात. एम आय डी सी मधील रस्त्याला ११० कोटींची मंजुरी दिली त्याचं काय झालं, मात्र त्यांची कामे कधी सुरू होणार असा सवाल उपस्थित करत आम्ही मंजूर केलेले रस्तेही आपल्या नावावर खपवत असल्याचा आरोप आमदार राजू पाटील (MLA Raju Patil) यांनी यावेळी केला.

आमदार राजू पाटील काय म्हणाले : पाहा व्हिडिओ

कल्याण शीळ रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रशचिन्ह उपस्थित होत असून याबाबत बोलताना आमदार पाटील यांनी या रस्त्याचे काम दर्जाहीन असल्याबाबत अनेकदा तक्रारी केल्या मात्र मंत्र्याचा स्थानिक लोकप्रतिधीनिंचा यांना पाठिंबा असल्याने काही फरक पडत नाही एक दिवस जनताच उत्तर देईल अस स्पष्ट केलं दरम्यान या रस्त्याच्या कामाबाबत कार्यकारी अभियंता नितीन बोरोले यांनी सांगितले की, रस्त्याच्या कामात राहून गेलेल्या त्रुटी असतील त्या लवकरच दूर केल्या जातील.

Kalyan Sheel Road funds are sanctioned hoardings are required, but when did the work actually start Raju Patils criticism on Shiv Sena