
याच परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा देखील वावर वाढत चालला आहे. त्यामुळे महिलांचे त्या मार्गातून जाणे येणे कठीण झाले आहे त्यामुळे लवकरात लवकर महिलांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक, सी सी टी वी कॅमेरा सारखे उपाय केले गेले पाहिजे या सर्व उपाय योजना त्वरित झाल्या पाहिजे अशा अनेक मागण्याचे निवेदन आयुक्तांना दिले आहे.
कल्याण : शिवसेना महिला आघाडी महिलांच्या प्रश्नांबाबत महिलांच्या मदतीला धावली असून आयुक्तांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. मनपाच्या ताब्यात असलेल्या आणि विकासकांनी आरक्षणांतर्गत बांधून दिलेल्या फिश मार्केट, मिनी मार्केट मध्ये महिला बचत गटांसाठी महिला सक्षमीकरणाच्या अंतर्गत प्राधान्य देण्यासाठी गाळे व ओटे माफक दरात भाडेतत्त्वावर मिळावेत.
ज्यामुळे त्यांना रोजगार मिळेल आणि पालिकेला देखील उत्पन्न सुरू होऊ शकेल. तसेच गौरी पाडा येथील मनपा आरक्षित भूखंडावर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पाच कोटी रुपये निधीतून मागासवर्गीय गुणवंत मुले व मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाच काम हे अंतिम टप्यात आहे. ते गरजवंत मागासवर्गीय मुला मुलींसाठी लवकर उपलब्ध करून द्यावे. तसेच कल्याण स्कायवॉक वरील गर्दुल्ले, चोरटे, भिकारी यांच्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
यावर उपाययोजना झाल्या पाहिजे. तसेच याच परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचा देखील वावर वाढत चालला आहे. त्यामुळे महिलांचे त्या मार्गातून जाणे येणे कठीण झाले आहे त्यामुळे लवकरात लवकर महिलांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक, सी सी टीव्ही कॅमेरा सारखे उपाय केले गेले पाहिजे या सर्व उपाय योजना त्वरित झाल्या पाहिजे अशा अनेक मागण्याचे निवेदन आयुक्तांना दिले आहे.
अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. आयुक्तां कडून देखील सकारात्मक उत्तर मिळाले असल्याचे शिवसेना कल्याण जिल्हा संघटक विजया पोटे यांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेविका सुशीला माली, छाया वाघमारे, शीतल मंढारी तसेच कल्पना कपोते, आशा रसाळ, विद्या चौधरी, नेहा नरे, नमिता सावंत आणि शिवसेना कल्याण महानगर प्रमुख विजय साळवी देखील उपस्थित होते.