shivsena protest in kalyan

केंद्र सरकारकडून(central government) सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीच्या(fuel prize hike) निषेधार्थ कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. कल्याण पूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली कोळसेवाडी येथील रिक्षा स्टँडजवळ करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात केंद्र शासनाच्या पेट्रोल डिझेल दर वाढीचा जाहीर निषेध करण्यात आला.

कल्याण : केंद्र सरकारकडून(central government) सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीच्या(fuel prize hike) निषेधार्थ कल्याण पूर्वेत शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. कल्याण पूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली कोळसेवाडी येथील रिक्षा स्टँडजवळ करण्यात आलेल्या या निषेध आंदोलनात केंद्र शासनाच्या पेट्रोल डिझेल दर वाढीचा जाहीर निषेध करण्यात आला. केंद्र शासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या निदर्शनात सामान्य नागरीकांनीही सहभाग घेऊन शिवसेनेच्या या आंदोलनात सहभाग नोंदवला. या आंदोलना दरम्यान रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या अपमानास्पद विधानामुळे दानवेंचाही निषेध व्यक्त करण्यात आला.

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यातच सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे. सामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे केंद्राने सामान्य जनतेच्या हितासाठी पेट्रोल आणि डिझेलची वाढीव किंमत कभी करून ती भविष्यात स्थिर ठेवावी,अशी मागणी यावेळी कल्याण पूर्व शिवसेना सहसंपर्क प्रमुख शरद पाटील यांनी केली.

या आंदोलनात नगरसेवक धनंजय बोडारे, महेश गायकवाड, निलेश शिंदे, राजाराम पावशे, पुरुषोत्तम चव्हाण, उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे, महिला आघाडीच्या विजया पोटे, प्रशांत बोटे, मनोज बेलमकर यांच्यासह कल्याण पूर्वेतील शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या महिला कार्यकर्त्या तसेच नागरीकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.