अभियांत्रिकी महाविद्यालयाची फी टप्प्याटप्प्याने भरण्याची मुभा द्या – कल्याणमधील विद्यार्थ्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र

कल्याण : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या फी मध्ये वाढ होऊ नये व पुढील वर्षाच्या फी मध्ये ४ टप्प्यांची मुभा मिळावी, अशी मागणी कल्याणमधील अभियांत्रिकी विद्यार्थी मिथिल जोशी याने

 कल्याण :  अभियांत्रिकी  महाविद्यालयाच्या फी मध्ये वाढ होऊ नये व पुढील वर्षाच्या फी मध्ये ४ टप्प्यांची मुभा मिळावी, अशी मागणी कल्याणमधील अभियांत्रिकी विद्यार्थी मिथिल जोशी याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि मुंबई विद्यापीठाकडे पत्राद्वारे केली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अभियांत्रिकी शिक्षण विभागाच्या शेवटची सत्रे सोडून सगळ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र हा विषाणू काही लगेच जाणार नाही असे स्पष्ट चित्र आपल्याला दिसत आहे. त्यामुळे कोणाचेही पालक नोकरीला जाऊ शकत नाही. कोणाचे व्यवसाय असतील तर ते देखील चालू नाहीत. त्यामुळे आर्थिक मंदी प्रत्येकाच्या घरात आता येणाऱ्या वर्षभरात जाणवणार आहे. शालेय विभागासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सरकारी आवेदन जाहीर करून शाळांनी माफक फी घ्यावी, असे जाहीर केले. मात्र अभियांत्रिकी विभागाच्या देखील फी या मोठ्या रकमेत असतात. आणि आता त्या एकाच वेळी भरणे खूप मुश्किल आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या फी भरण्यासाठी प्रत्येक कॉलेजने कमीत कमी ४ टप्प्यांमध्ये मुभा  देणे गरजेचे वाटत असल्याचे मिथिल जोशी या विद्यार्थ्याने आपल्या पत्रात नमूद केले आहे.

कोरोनाचे संकट कधी टळेल हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे काही विद्यार्थी शैक्षणिक कर्जाच्या बोजाखली आहेत. त्यामुळे प्रत्येक कॉलेजला तंत्र शिक्षण मंत्र्यांनी कडक आदेश देऊन कोणालाही पुढील वर्षाच्या फी साठी जबरदस्ती करू नये.  कमीत कमी ४ टप्प्यांमध्ये फी भरण्याची मुभा द्यावी. महाराष्ट्र सरकार पदोपदी हिताचे निर्णय घेत आहे.  महाराष्ट्राला सर्व संकटापासून वाचवण्याचे काम करत आहे.  विद्यार्थ्यांनाही मदत करावी, अशी मागणी मिथिल जोशी या विद्यार्थ्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.