dipak adke

कल्याण तहसीलदार दिपक आडके(Dipak Adke), शिपाई बाबु उर्फ मनोहर हरड(Manohar Harad) या दोन लाचखोरांना सोमवारी दुपारी ठाणे(Thane) लाचलुचपत विभागाच्या पथकाने(Anti Corruption Bureau) कल्याण तहसीलदार कार्यालयातील दालनात रंगेहाथ पकडले आहे.

    कल्याण : बांधकाम कंपनीच्या मौजै वरप येथील जमिनीबाबतचे हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्याप्रकरणी एकुण १लाख २०हजार रु.लाच प्रकरणी तक्रारीवरून कल्याण तहसीलदार दिपक आडके(Dipak Adke), शिपाई बाबु उर्फ मनोहर हरड(Manohar Harad) या दोन लाचखोरांना सोमवारी दुपारी ठाणे(Thane) लाचलुचपत विभागाच्या पथकाने(Anti Corruption Bureau) कल्याण तहसीलदार कार्यालयातील दालनात रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणामुळे लाचखोरीचे ग्रहण कल्याण(kalyan) तहसीलदार कार्यालयाला लागल्याचे समोर आल्याने येथील भ्रष्ट कारभाराचे पुरते वाभाडे निघाले असल्याचे चित्र दिसत आहे.

    बांधकाम कंपनीच्या वरप येथील घेतलेल्या जमिनीबाबतचे हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी २६ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान तक्रारदाराकडे १ लाख २० हजार रू. लाचेची मागणी तहसीलदार आकडे यांनी केली होती. त्या लाचेतील १ लाख रु. स्वतःसाठी तसेच कार्यालयीन शिपाई मनोहर हरड याने स्टाफकरिता २० हजार रू. लाचेची मागणी केली होती.

    तक्रारदाराच्या तक्रारीनुसार पडताळणी करीत सोमवारी दुपारी ठाणे लाचलुचपत विभागाने पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तहसीलदार कार्यालयात सापळा लावित कल्याण तहसीलदार दिपक आडके, शिपाई मनोहर हरड यांना दालनात लाच घेताना रंगेहाथ पकडल्याने तहसीलदार कार्यालयातील दलाल, लाचखोरीच्या ग्रहणांच्या चर्चा सर्वसामान्यापासुन सर्वच स्तरात रंगल्या होत्या.