कल्याणमध्ये अडकलेल्या मजुरांना बिहारला सोडण्यासाठी नगरसेवकाने केली गाडीची व्यवस्था

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत. त्याचप्रमाणे मोल मजुरी करणाऱ्यांचा रोजगारदेखील बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा मोल

कल्याण : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद आहेत. त्याचप्रमाणे मोल मजुरी करणाऱ्यांचा रोजगारदेखील बंद असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा मोल मजुरी करुन जीवन व्यथित करणाऱ्या परप्रांतीय लोकांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी कल्याणमधील नगरसेवक कुणाल पाटील परप्रांतीय मजुरांच्या मदतीला धावले. त्यांनी मजुरांना गाडीची व्यवस्था करुन दिली.

कोरोनामुळे देशावर खूप मोठे संकट आले असून शासनाने तात्पुरती उपयोजना करण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे. हा लॉकडाऊन तिसऱ्या टप्प्यात असताना चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनचेदेखील संकेत दिले आहेत. त्यामुळे अशा अनिश्चित स्वरूपाच्या लॉकडाऊनमुळे लोकांकडे रोजगार नाहीत आणि त्यातल्या त्यात दैनंदिन मजुरी करणाऱ्या मजुरांचे खूप हाल होत आहेत आणि शासनाच्या रेल्वे किंवा सार्वजनिक वाहतूक सेवा पण खूप मर्यादित आहेत. अशा परिस्थिती मध्ये बहुतेक परप्रांतीय लोकं विशेषतः उत्तर भारतीय लोकं गावी जाण्यासाठी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे अशा गरजू लोकांना मदत व्हावी म्हणून नगरसेवक कुणाल पाटील यांनी त्यांची आरोग्य तपसणी करुन त्यांना मास्क देखील देऊन स्वखर्चाने त्यांच्यासाठी खाजगी गाड्यांद्वारे टाटा पॉवर ते बिहार (सासाराम) या गावी सोडण्याची व्यवस्था करून दिली. दरम्यान या सुमारे ४०० मजुरांना आपल्या गावी जायला मिळणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त करत नगरसेवक कुणाल पाटील यांचे आभार व्यक्त केले.