कल्याणच्या ट्रक टर्मिनलजवळचे फळे व कांदा बटाटा मार्केट बंद, एपीएमसीच्या गाळ्यांमध्ये ठराविक वेळेत होणार विक्री

कल्याण : कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरणारा फळे व कांदा बटाटा मार्केट हे दुर्गाडीपूल बंदर नाका येथील महापालिकेच्या ट्रक टर्मिनलवरील जागेतील गाळयात

 कल्याण : कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरणारा फळे व कांदा बटाटा मार्केट हे दुर्गाडीपूल बंदर नाका येथील महापालिकेच्या ट्रक टर्मिनलवरील जागेतील गाळयात स्थलांतरीत करण्यात आले होते. सदर जागेवरील गाळयामध्ये एक दिवसाआड सम तारखेस फळे व कांदा बटाटा मार्केट सुरु करण्यात आलेले होते तथापि महापालिकेच्या ट्रक टर्मिनलवर होणाऱ्या गर्दीचा विचारात घेता ट्रक टर्मिनल येथील फळे व कांदा बटाटा मार्केट बंद करण्यात येत असून हा बाजार आजपासून पूर्वीप्रमाणेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळयामध्ये फक्त सकाळी ७.०० ते सायंकाळी ५. ०० वाजेपर्यंत चालू ठेवण्यात यावा, असे आदेश पालिका आयुक्त, डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.