कल्याणमध्ये राज्याबाहेर जाणाऱ्या नागरिकांची परवानगी पत्रासाठी प्रभाग कार्यालयाबाहेर गर्दी

कल्याण : राज्यांतर्गत आणि राज्याच्या बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्व प्रभाग क्षेत्र कार्यालयांबाहेर परवानगी पत्र घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती.

 कल्याण : राज्यांतर्गत आणि राज्याच्या बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सर्व प्रभाग क्षेत्र कार्यालयांबाहेर परवानगी पत्र घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी कल्याण डोंबिवलीच्या ब प्रभाग क्षेत्रबाहेर पोलीस आणि पालिका प्रशासनकडून सुव्यवस्थित काम चालू असल्याचे दिसून आले तर ‘क’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या ठिकाणी नियोजनाचा आभाव दिसून आला.

लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असलेल्या अनेक मजूर आणि कामगारांवर उपासमारीची वेळ ओढवली. काही सामाजिक संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय पक्षांकडून काहीशी मदत मिळाली. मात्र ही मदत किती दिवस पुरणार तर गॅस सिलेंडर नसेल तर अन्न शिजणार कसे असा प्रश्न सतावत असलेल्या नागरिकांनी अखेर आपल्या गावी परतीची वाट धरली होती. मात्र काही अंतरावर त्यांना अड़वण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या रूग्णांमुळे लॉकडाउन वाढले. अनेकांकडून गावी जाण्यासाठी गाड़ी सोडण्यात यावी तसेच परवानगी देण्याची मागणी होत होती. यावर शासनाने मार्ग काढत लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांसाठी व कामासाठी आलेल्या नागरिकांना आपल्या गावी पाठवण्यासाठी सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी स्वताकडील पुरावा घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थेकडून आरोग्य तपासणी करुन पत्रक घेण्यासाठी अनेकांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या बाहेर हजरोंच्या संख्येने गर्दी केली होती. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ब प्रभाग क्षेत्र कार्यालयात आरोग्य पत्रक आणि नॉन कंटेंटमेंट झोनचा दाखला घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची नियोजन पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या नागरिकांना तपासण्यासाठी ३ डॉक्टर येथे उपस्थित आहेत. ते रुग्णांची तपासणी करून त्यांना आरोग्य दाखला देत आहे. हे काम लवकर होण्यासाठी डॉक्टर वाढवण्यात येणार आहेत. जिल्हा निहाय राज्य निहाय वर्गवारी करण्यात आली आहे यात उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांना प्राधान्य देण्यात आले असल्याचे ब प्रभाग क्षेत्र अधिकारी गुप्ते यानी सांगितले. तसेच नागरिकांनी शांतता राखावी आणि सहकार्य करावे ,असे आवाहन देखील केले आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या क प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या बाहेर जमा झालेल्या नागरिकाची ताराबाळ उडाली असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांना फॉर्म देखील देण्यात आले नाही. कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. तर नियोजन शून्य असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.  परवानगीसाठी पालिकेकड़ून  देण्यात येणाऱ्या फॉर्म प्रभाग क्षेत्र कार्यालयात उपलब्ध नव्हते तर ते स्थानिक समाजसेवक तथा मनसे कल्याण शहर संघटक रूपेश भोईर यानी स्वख़र्चाने उपलब्ध करुन दिले. सर्व प्रभागात सुव्यवस्थित सर्व सुरु असताना या क प्रभाग कार्यालयात अशी दुरावस्था का असा सवाल भोईर यांनी उपस्थित केला आहे.