पांढऱ्या वर्दीतल्या ‘त्या’ देवदुुतांनी वाचविले एका महिलेचे प्राण – केली मोफत शस्त्रक्रिया

कल्याण : कोरोनासारख्या महामारीच्या काळात डॉक्टर हे देवदुताच्या भुमिकेत कार्यरत असुन सीमेवरील एका योद्ध्याप्रमाणे लढत आहेत. याचीच प्रचिती मीरा रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेला आली

 कल्याण : कोरोनासारख्या महामारीच्या काळात डॉक्टर हे देवदुताच्या भुमिकेत कार्यरत असुन सीमेवरील एका योद्ध्याप्रमाणे लढत आहेत. याचीच प्रचिती मीरा रुग्णालयात दाखल असलेल्या एका महिलेला आली आहे.

कल्याणमधील पत्रीपुल परिसरात राहणारी साधना विश्वकर्मा ही २२ वर्षीय गरीब महिला पोटात प्रचंड दुखत असल्याने शुक्रवारी मीरा रुग्णालयात आली होती.  ओपोडी तापसणीत स्त्रीरोग तज्ञ डॉ. अनिता मॅथ्यु यांना वैद्यकीय तपासणीत गर्भपातामुळे पोटात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने हा त्रास असल्याचे निर्दशनास आले. मॅथ्यु आणि  डॉक्टर नितीन झबक यांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला त्या महिलेला दिला. मात्र पैशांअभावी ती शस्त्रक्रिया न करण्याचा निर्णय घेत ही महिला तशीच निघून गेली. ही पोटदुखी या महिलेच्या जीवावर बेतू शकते आणि पैशांमुळे तिने शस्त्रक्रियेला नकार दिल्याचे डॉक्टरांना समजले. या महिलेला होणारा त्रास डॉक्टरांनाच पाहावला गेला नाही. माणसाच्या रूपातील या देवमाणसांनी या महिलेला तातडीने बोलवून घेत एकही रुपया न घेता ही शस्त्रक्रिया केली आणि तिला जीवदान दिले.

डॉ.नितीन झबक आणि डॉ. अनिता मॅथ्यू डॉ. थोरात यांनी ही मोफत शस्त्रक्रिया करत माणुसकी आणि संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. तर मीरा रुग्णालयाचे डॉक्टर गौतम गणवीर यांनी रुग्णालयाचे संपूर्ण बिल माफ तर केलेच  त्याशिवाय या सर्व डॉक्टरांनी नव्हे तर देवदूतांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढत या महिलेच्या औषधांचीही व्यवस्था केली. या माणुसकीबद्दल संबंधित कुटुंबियांनी सर्व डॉक्टरांचे मनापासून आभार मानले. तर मीरा रुग्णालयाचे डॉ. राहनुमा यांनी सांगितले की, शस्त्रक्रिया झालेल्या गरीब महिलेची प्रकुती ठीक असुन येत्या दोन दिवसांमध्ये तिला डिस्चार्ज मिळणार आहे. यानिमित्ताने  ‘देवाक काळजी रे!’ च्या ऐवजी पांढऱ्या वर्दीतील देवदुतास काळजी रे! असे म्हणवे लागले.