kdmc commisioner vijay suryavanshi

कल्याण :  कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात विजेच्या लपंडावाच्या घटना घडतात. कोरोना पार्श्वभूमीवर कोव्हिड रूग्णालयात कोरोना रूगणावर उपचार सुरू असताना रुग्णाची ऑक्सिजन पुरवठ्याअभावी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे अशा रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून विद्युत पुरवठा बंद पडल्यास जनरेटर/ इन्व्हर्टरची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

कल्याण :  कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात विजेच्या लपंडावाच्या घटना घडतात. कोरोना पार्श्वभूमीवर कोव्हिड रूग्णालयात कोरोना रूगणावर उपचार सुरू असताना रुग्णाची ऑक्सिजन पुरवठ्याअभावी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे अशा रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून विद्युत पुरवठा बंद पडल्यास जनरेटर/ इन्व्हर्टरची व्यवस्था करण्याचे निर्देश आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा ठप्प बंद झाल्यास रूग्णांना देण्यात येणाऱ्या ऑक्सिजन सुविधा सुरळीत चालू राहतील. सोमवारी सकाळी बिघाडामुळे सर्वत्र विद्युत पुरवठा बंद पडला होता.

महापालिका परिसरात बरेच वेळा विद्युत पुरवठा बंद पडण्याचा घटना घडतात. सध्याच्या परिस्थितीत महापालिकेने अनेक रुग्णालयांना कोव्हिड रुग्णालयांचा दर्जा दिलेला आहे. या रुग्णालयातील विद्युत पुरवठा अचानक बंद पडल्यास या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाची ऑक्सिजन पुरवठ्याअभावी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे अशा रुग्णाची गैरसोय होऊ नये म्हणून विद्युत पुरवठा बंद पडल्यास जनरेटर/ इन्व्हर्टरची पर्यायी व्यवस्था करण्याबाबतचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहे.