विरोधी पक्षातील नेत्यांच्या शिष्टमंडळाने कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे दिल्या कोरोना नियंत्रणासाठीच्या सूचना

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना महामारीचा उद्रेक झाला असून प्रशासन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असमर्थ ठरत आहे. मार्च अखेर १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या होती. दोन

 डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना महामारीचा उद्रेक झाला असून प्रशासन त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असमर्थ ठरत आहे. मार्च अखेर १८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या होती. दोन महिन्यांच्या काळात आता ७५० हून अधिक झाली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी आता स्थानिक सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना सोबत घेणे गरजेचे आहे, अशा विषयाचे निवेदन विरोधीपक्ष शिष्टमंडळाने पालिका आयुक्त डॉ. रवींद्र सूर्यवंशी यांना देण्यात आले आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्व आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले.

आयुक्तांना निवेदन देतांना शिष्टमंडळात खासदार कपिल पाटील, आमदार गणपत गायकवाड, मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, माजी आमदार प्रकाश भोईर, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, विरोधी पक्षनेते राहुल दामले, स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे, गटनेते शैलेश धात्रक, मनसे गटनेते मंदार हळबे, मनसे उपाध्यक्ष राजेश कदम, मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर उपस्थित होते.

आयुक्तांना देलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरोग्य आणीबाणीमधून आपल्या शहराला मुक्त करायचं असल्याने सद्य स्थितीतील त्रुटी सुधारणे गरजेचे आहे. यासाठी प्रभाग क्षेत्र निहाय नगरसेवक बैठका घेणे अत्यावश्यक बनले आहे. जेणेकरून स्थानिक नगरसेवकांकडून सूचना, माहिती आदानप्रदान करता येईल व संभाव्य संसर्गावर “हायपर लोकल” पद्धतीने नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. प्रत्येक प्रभाग क्षेत्रात ५ ऍम्ब्युलन्स उपलब्ध असणे आवश्यक आहे. कोरोनावर कोणताही इलाज दृष्टीपथात नसल्याने संसर्ग नियंत्रण हाच उत्तम मार्ग आहे म्हणून महापालिका क्षेत्रातील प्रत्येक नागरिकाची प्राथमिक चाचणी मोफत व्हावी. पालिका कर्मचाऱ्यांची क्षमता लक्षात घेता हे अशक्य असल्याने एनसीसी, एनएसएस व अन्य स्वयंसेवी संस्था, पॅरामेडिक संस्था, एनजीओ आणि मुख्यतः गृहसंकुले, चाळ कमिट्या यांच्या सहभागाने कोविड योद्धे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. त्यांच्याच माध्यमातून प्राथमिक टेम्परेचर चेकिंग व्यवस्था उभारण्याचे प्रयत्न करावेत. पालिकेने डिजिटल थर्मामीटर उपलब्ध करून द्यावे. विशेषतः प्रत्येक सोसायटीला डिजिटल थर्मामीटर  सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावे आणि प्रोत्साहन म्हणून मालमत्ता करात सवलत द्यावी.

महापालिकेत स्वतःचे स्वॅब सेंटर असावे, जेणेकरून २४ तासात चाचणी करता येईल व नमुने चाचणी अहवाल त्वरित मिळेल. त्याबरोबर चाचणी मोफत व्हावी व चाचणी अहवालही मोफत मिळावेत. आयुष मंत्रालयाने सांगितलेल्या गोळ्या महापालिकेने मोफत उपलब्ध करून द्याव्यात. महापालिकेची रुग्णालये, हेल्थ पोस्ट यंत्रणा अद्ययावत करावी. कोरोना रुग्णांना चांगले भोजन देणे. सध्याचे भोजन कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे भोजन देत आहेत त्यांना समज द्यावी अन्यथा बदलावे.महापालिकेत नवीन बेड्सची व्यवस्था निर्माण करण्याकरिता बीएसयुपी सदनिका वापराव्या, डोंबिवली क्रीडा संकुलातील मॉलचा वापर सुरु करावा, शहाड येथील निर्मल लाईफ स्टाईलमधील सदनिका, लोढा यांच्या खोणी टाउनशिपमधील म्हाडाच्या ताब्यातील ३००-३३५० सदनिका वापरण्यात याव्यात,असेही निवेदनात सांगण्यात आले आहे.