जीवनावश्यक वस्तुंची घरपोच सुविधा न देणाऱ्या दुकानदारांनी दुकाने उघडी ठेवल्यास होणार गुन्हा दाखल

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना साथीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तूची दुकाने सकाळी ५.०० वाजल्यापासून दुपारी २.००

  कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना साथीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिका क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तूची दुकाने सकाळी ५.०० वाजल्यापासून दुपारी २.०० वाजेपर्यंत सुरू राहतील( रुग्णालय, मेडिकल, एल पी जी गॅस सिलेंडर, उदवाहन वगळता) असा आदेश यापूर्वीच निर्गमित करण्यात आला होता. तथापी कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधित रुग्ण आढळलेले व कंटेंटमेंट झोन घोषित केलेला भाग तसेच संभाव्य हायरिस्क क्षेत्र असलेल्या भागातील   जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, भाजीपाला विक्रेते व फळ व अन्न पदार्थ विक्रेते, चिकन व मटण दुकाने यास त्यांच्या मालाची विक्री करण्यासाठी जे दुकानदार घरपोच माल ( होम डिलीव्हरी) पोहचविण्याची व्यवस्था करतील त्याच दुकानदाराना सकाळी ५.००पासून दुपारी २.००  वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे.  तथापि या दुकानदाराना त्यांच्या दुकानातील प्रत्यक्ष काउंटरवर नागरिकांना मालाची विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच सदर परिसरातील नागरिकांनी  बाहेर जाऊन अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यास प्रतिबंध करण्यात येत असून संबधित परिसरातील नागरिकांना त्यांना आवश्यक असलेल्या वस्तू  घरपोच सेवा देणाऱ्या दुकांनदाराकडून प्राप्त  करून मागवून घ्याव्यात. घरपोच सेवा सुविधा न देणाऱ्या दुकानदारांनी दुकाने चालू ठेवल्यास त्यांचे विरुध्द गुन्हे नोंदविण्यात येतील,ग्राहकांना घरपोच सेवा उपलब्ध करून देणे कामी मनुष्यबळाची कमतरता असल्यास दुकानदारांनी स्वयंसेवक उपलब्ध करून घेणेकामी संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी वॉर रूम हेल्पलाईन क्र.०२५१-२२११३७३ वर संपर्क साधावा .