कल्याण डोंबिवलीत ३० नवीन रुग्णांची वाढ – कोरोना रुग्णांची संख्या ७२७

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ३० नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजच्या या ३० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या ७२७ झाली आहे. यापैकी

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ३० नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजच्या या ३० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या  ७२७ झाली आहे. यापैकी आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून २६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ४४१ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज आढळलेल्या या ३० रूग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील १०, कल्याण पश्चिमेतील २, डोंबिवली पूर्वेतील ४, डोंबिवली पश्चिमेतील १२,  ठाकुर्लीतील १, तर टिटवाळा येथील १ रुग्णाचा समावेश आहे. आजच्या रुग्णांमध्ये १८ पुरुष, ११ महिला, तर १  मुलाचा समावेश आहे. आज आढळलेले हे रुग्ण कल्याण पूर्वेतील नांदिवली, एफ केबिन रोड, तिसगाव १०० फुटी रोड, दुर्गा माता मंदिर रोड कोळशेवाडी, लोकग्राम, काटेमानिवली, पुना लिंक रोड, तिसगाव, कल्याण पश्चिमेतील आधारवाडी, गोल्डनपार्क फेज २,  डोंबिवली पूर्वेतील  टिळकनगर, नाना नानी पार्क जवळ, गोग्रासवाडी,  डोंबिवली पश्चिमेतील दिनदयाल रोड, रेतीबंदर रोड, गरीबाचा वाडा, कोपरगाव,शंकर मंदिराजवळ, सखारामनगर, ठाकुर्ली पूर्वेतील चोळे गाव, टिटवाळ्यातील दुबे कॉलेज या परिसरातील आहेत.