कल्याण डोंबिवलीमध्ये आज ७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद , ४ जणांना मिळाला डिस्चार्ज

कल्याण : - कल्याण डोंबिवलीमध्ये आज नव्याने कोरोनाच्या ७ रुग्णांची वाढ झाली असून ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची

 कल्याण :  – कल्याण डोंबिवलीमध्ये आज नव्याने कोरोनाच्या ७ रुग्णांची वाढ झाली असून ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १६९ झाली आहे. या १६९ रूग्णांपैकी ३ रुग्ण मयत झाले असून आतापर्यंत ५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ११५ रुग्ण उपचार घेत आहेत.आज आढळलेल्या नवीन रुग्णांमध्ये डोंबिवली पश्चिमेतील ५० वर्षीय आणि २२ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर डोंबिवली पूर्वेतील ५८ वर्षीय महिला आननी ८ वर्षीय बालिकेचा आननी कल्याण पूर्वेतील ३१ वर्षीय महिलेचा देखील सामावेश आहे. हे पाचही रुग्ण कोरोना बाधित  रुग्णांचे सहवासित आहेत. तर मुंबई येथील शासकीय रुग्णालयात स्टाफ नर्स असणाऱ्या कल्याण पूर्वेतील ४४ वर्षीय महिलेचा आणि ३४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

एकूण १६९ रुग्णांची वर्गवारी – कल्याण पूर्व ३४, कल्याण पश्चिम २१, डोंबिवली पूर्व ५९, डोंबिवली पश्चिम ४३, मांडा टिटवाळा ६, मोहने ६