कल्याण डोंंबिवलीमध्ये आज ६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने शहरातील रुग्णांची संख्या १४३

कल्याण : - कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात नवीन ६ कोरोना रुग्णांची भर पडली असून आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १४३ झाली आहे. कोरोना लागण होणाऱ्या या रुग्णांमध्ये मुंबई येथे काम

कल्याण : –  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात नवीन ६ कोरोना रुग्णांची भर पडली असून आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १४३ झाली आहे.  कोरोना लागण होणाऱ्या या रुग्णांमध्ये मुंबई येथे काम करणारयांचा आणि कोरोना बाधित रूग्णांच्या निकटवर्तीयांचा जास्त सहभाग आहे.  आज आढळलेल्या नवीन ६ रुग्णांमध्ये डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या आणि मुंबई येथे वृत्तवाहिनीच्या २८ वर्षीय पत्रकाराला, ३८ वर्षीय मुंबई येथील हॉटेलच्या कर्मचाऱ्याचा, नांदिवली येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय वाशी ए.पी.एम.सी. भाजी मंडईतील सुरक्षा रक्षक, मोहने येथील कोरोना बाधीताचा सह्वासित १२ वर्षीय मुलगा, कल्याण पश्चिमेत राहणारा दादर, मुंबई येथील खाजगी कंपनीचा ३३ वर्षीय अभियंता, आणी कल्याण पूर्वेत राहणारे मुंबई येथील ४७ वर्षीय पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.
महापालिका क्षेत्रातील एकुण रुग्ण संख्या १४३ झाली असून या रुग्णांपैकी ३ जण मयत,  तर ४५ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयात ९५ रुग्ण उपचार घेत आहेत. 
दरम्यान कोरोना साथीचा प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्‍यासाठी महापालिका क्षेत्रात विविध स्‍तरावर युध्‍दपातळीवर प्रतिबंधात्‍मक कारवाई करण्‍यात येत आहे. महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधित व्‍यक्तीच्‍या संपर्कात आलेल्‍या व्‍यक्तींचे नमुने गोळा करुन त्‍यांना खबरदारी म्‍हणून पुढील १४ दिवस क्‍वारंटाईन करण्‍यात येत आहे. परंतू काही रुग्‍णांना १४ दिवसानंतरही लक्षणे आढळून आलेली आहेत, असे निदर्शनास आले आहे. त्‍यामुळे असे रुग्‍ण १४ दिवसानंतर इतर रुग्‍णांच्‍या संपर्कात येवून इतरांनाही बाधित करण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्‍यामुळे यापुढे कोरोना बाधित रुग्‍णांच्‍या संपर्कातील व्‍यक्‍ती तसेच प्रवास इतिहास असणाऱ्या
प्रवाशांचा क्‍वारंटाईन कालावधी १४ दिवसावरुन २८ दिवसांपर्यंत करण्‍यात आला आहे. त्‍याअन्‍वये या रुग्‍णांना, रुग्‍णाच्‍या संपर्कात आल्‍यापासून वा बाधित भागातून प्रवास केल्‍यापासून २८ दिवसापर्यंत क्‍वारंटाईन करण्‍यात येणार आहे.