डोंबिवलीत २० दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण- कल्याण डोंबिवलीत नवीन ६ रुग्ण, कोरोना रुग्णांची संख्या १६२

कल्याण : डोंबिवलीमध्ये २० दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून या बाळाच्या आईलादेखील कोरोनाची लागण झाली असून याआधी या बाळाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची

 कल्याण : डोंबिवलीमध्ये २० दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले असून या बाळाच्या आईलादेखील कोरोनाची लागण झाली असून याआधी या बाळाच्या वडिलांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची संसर्गातून या बाळाला आणि त्याच्या आईला कोरोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात ६ नवीन रुग्णांची भर पडली असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १६२ झाली आहे. या रुग्णांपैकी – ३ रुग्ण मृत असून ४७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर विविध रुग्णालयात ११२ रुग्ण उपचार घेत आहेत. आज आढळलेल्या नवीन ६ रुग्णांमध्ये डोंबिवली पूर्वेतील ३३ वर्षीय महिलेचा आणि तिच्या २० दिवसांच्या बाळाचा समावेश असून हे दोघेही कोरोना बाधित रुग्‍णाचे सहवासित आहेत.  तर मुंबई येथील शासकीय आरोग्य कर्मचारी असलेल्या कल्याण पश्चिम मध्ये राहणाऱ्या ४० वर्षीय पुरुषाला, मुंबई येथील खाजगी रुग्णालयातील कर्मचारी असलेल्या टिटवाळा पूर्व येथील ४२ वर्षीय महिलेला देखील कोरोनाची लागण झाली आहे. तर वाशी येथील ए.पी.एम.सी. मार्केट मधील कामगार असलेल्या डोंबिवली पश्चिमेतील ४५ वर्षीय २ पुरुषांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

एकुण १६२  रुग्णांची वर्गवारी – कल्याण पूर्व – ३०,  कल्याण पश्चिम – २१,  डोंबिवली पूर्व – ५७,  डोंबिवली पश्चिम – ४१, मांडा टिटवाळा – ६,  मोहने – ६,  नांदिवली – १