कल्याण डोंबिवलीत आज १८ कोरोनाबाधित आढळल्यानंतर शहरातील कोरोना रुग्णांची संंख्या २०० पार

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाने आपले द्विशतकही पूर्ण केले असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या २१३ झाली आहे. आज नव्याने कल्याण डोंबिवली परिसरात १८ रुग्ण आढळले असून तर ३

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाने आपले द्विशतकही पूर्ण केले असून एकूण कोरोना रुग्णांची संख्या २१३ झाली आहे. आज नव्याने कल्याण डोंबिवली परिसरात १८ रुग्ण आढळले असून तर ३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून यामध्ये दीड वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.  महापालिका क्षेत्रातील एकूण २१३ रूग्णांपैकी ३ जण मयत असून ६८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एकूण १४२ रुग्ण उपचार घेत आहेत. पालिका क्षेत्रातील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब असून पालिका प्रशासनाने आणखी नियम कठोर करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. 

आज आढळलेल्या रूग्णांमध्ये मोहन्यातील २९ वर्षीय महिला मुंबई येथील पोलीस कर्मचारी, मांडा टिटवाळा येथील ३५ वर्षीय पुरुष मुंबई येथील पोलीस कर्मचारी, डोंबिवली पश्चिम येथील ३३ वर्षीय पुरुष मुंबई येथे शासकीय रुग्‍णालयातील आरोग्‍य कर्मचारी, कल्याण पश्चिम मधील ३५ वर्षीय पुरुष मुंबई येथील पोलीस कर्मचारी, डोंबिवली पश्चिम येथील ३६ वर्षीय पुरुष वाशी ए.पी.एम.सी. मार्केट मधील कर्मचारी, कल्याण पश्चिमेतील ४२ वर्षीय पुरुष आणि कल्याण पूर्वेतील ३३ वर्षीय महिला हे कोरोनाबाधित रुग्‍णाचे सहवासित आहेत. कल्याण पूर्वेतील ४२ वर्षीय पुरुष वाशी येथील पोलीस कर्मचारी, ३८ वर्षीय पुरुष मुंबई येथील शासकीय कार्यालयातील सफाई कर्मचारी, डोंबिवली पूर्वेतील ७२ वर्षीय महिला, २३ वर्षीय महिला, २५ वर्षीय पुरुष, २० वर्षीय महिला, ४३ वर्षीय महिला, मांडा टिटवाळा येथील ५८ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय पुरुष, २६ वर्षीय महिला ही कोरोनाबाधित रूग्‍णाचे सहवासित आहेत. तर कल्याण पश्चिममधील ३४ वर्षीय पुरुष हा भिवंडी येथील फार्मा कंपनीतील कर्मचारी असल्याची माहिती पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.