कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे ११ नवीन रुग्ण तर ६ जणांना डिस्चार्ज-  कोरोना रुग्णांची संख्या २२४

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत आज नवीन ११ कोरोना रुग्णांची भर पडली असून ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २२४ झाली असून यापैकी

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत आज नवीन ११ कोरोना रुग्णांची भर पडली असून ६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २२४ झाली असून यापैकी ३ जण मृत तर आतापर्यंत ७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुग्णालयात १४७ रुग्ण उपचार घेत आहेत. आज आढळलेल्या ११ रूग्णांपैकी ८ रुग्ण हे मुंबई आणि नवी मुंबई येथे काम करणारे कर्मचारी आहेत. 

आज आढळलेल्या नवीन ११ रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील ६ रूग्णांचा समावेश असून यामध्ये मुंबई येथील पोलीस कर्मचारी असलेल्या २२ वर्षीय महिला, ३२ वर्षीय महिला, ४२ वर्षीय महिला आणि ३२ वर्षीय पुरुषाचा, ३८ वर्षीय मुंबई येथील खाजगी रुग्णालयातील फार्मासिस्ट आणि कोरोना बाधित रुग्णाचा सहवासित असलेल्या २६ वर्षीय महिलेचा समावेश आहे. डोंबिवली पश्चिमेतील मुंबई येथील खाजगी रुग्णालयात स्टाफ नर्स असलेल्या २२ वर्षीय महिलेला आणि ए.पी.एम.सी. मार्केट मधील ३५ वर्षीय पुरुष कर्मचाऱ्याचा समावेश आहे. मांडा टिटवाळा येथील कोरोना बाधित रुग्णाच्या व ५५ वर्षीय पुरुषाला,  डोंबिवली पूर्वेत राहणाऱ्या ए.पी.एम.सी मार्केट मधील कर्मचारी असलेल्या ३३ वर्षीय पुरुषाला, कल्याण पश्चिमेतील खाजगी क्लासमधील कर्मचारी असलेल्या ४४ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.