कल्याणमध्ये आज आढळले कोरोनाचे ९ रुग्ण – कोरोना रुग्णांची संख्या २३३ वर

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या २३३ झाली असून आज नवीन ९ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वेतील असून डोंबिवली, टिटवाळा आणि

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या २३३ झाली असून आज नवीन ९ रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्वेतील असून डोंबिवली, टिटवाळा आणि मोहने परिसरात आज एकही नवीन रुग्ण न आढळल्याने येथील नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे.  महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्ण २३३ रुग्णापैकी ३ जण मयत, तर ७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून विविध रुग्णालयांत  १५४ रुग्ण उपचार घेत आहेत. आज आढळलेल्या ९ रुग्णांमध्ये कल्याण पश्चिमेतील ४४ वर्षीय महिला, ३० वर्षीय महिला, मुंबई येथील पोलीस कर्मचारी असलेले ४८ वर्षीय आणि ४३ वर्षीय पुरुष या चौघांचा समावेश आहे. तर कल्याण पूर्वेतील मुंबई येथील ३४ वर्षीय पुरुष पोलीस कर्मचारी, मुंबई येथील ३७ वर्षीय पुरुष वाहतूक पोलीस कर्मचारी, २८ वर्षीय महिला  मुंबई येथील शासकिय सेवेतील सुरक्षा कर्मचारी, ३२ वर्षीय पुरुष ठाणे येथील खाजगी कंपनीतील कर्मचारी, तर महापे नवी मुंबई येथील खाजगी कंपनीतील ३३ वर्षीय पुरुष कर्मचारी यांचा समावेश आहे.