कल्याण डोंबिवलीमध्ये आज आढळले २७ रुग्ण – कोरोनाग्रस्तांचा आकडा २८०

कल्याण : कोरोना रुग्णांची संख्या कल्याण डोंबिवलीमध्ये रोजच नवा उच्चांक गाठत असून आज तब्बल २७ नवीन रुग्ण कल्याण डोंबिवलीत आढळले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना

 कल्याण : कोरोना रुग्णांची संख्या कल्याण डोंबिवलीमध्ये रोजच नवा उच्चांक गाठत असून आज तब्बल २७ नवीन रुग्ण कल्याण डोंबिवलीत आढळले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २८० झाली असून यापैकी ३ जण मृत तर ७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून २०० जण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. 

 आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील ६, कल्याण पश्चिमेतील १०, डोंबिवली पूर्वेतील ६, डोंबिवली पश्चिमेतील ४ तर आंबिवली येथील १ रुग्णाचा समावेश आहे. या कोरोनाबाधित रुग्णांपैकी ६ जण नवी मुंबई येथे ये-जा करणारे असून ३ जण ठाणे येथे ये-जा करणारे व १२ जण मुंबई येथे कर्तव्यासाठी ये-जा करणारे आहेत. तसेच १ कोरोना बाधित रुग्ण परराज्यातून आलेला आहे. त्याचप्रमाणे २ कोरोना बाधित रुग्ण हे यापूर्वी कोरोना बाधित झालेल्या मुंबई येथील पोलीस कर्मचाऱ्याचे निकट सहवासित असल्याची माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.