कल्याण डोंबिवलीमध्ये आज २४ रुग्णांना कोरोनाची बाधा – आकडा ३०० पार

कल्याण : डोंबिवलीमध्ये कोरोनामुळे ६७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे तिहेरी शतक देखील पूर्ण केले आहे. तर आज नव्याने २४ रुग्ण आढळल्याने कोरोना

 कल्याण : डोंबिवलीमध्ये कोरोनामुळे ६७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे तिहेरी शतक देखील पूर्ण केले आहे. तर आज नव्याने २४ रुग्ण आढळल्याने कोरोना रुग्णांचा आकडा ३०५ झाला आहे. त्याचबरोबर आज ८ रुग्णांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. 

कोरोनाच्या ३०५ रूग्णांमध्ये मुंबई व अन्यत्र कर्तव्यासाठी ये-जा करणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२१ असून त्यांच्यामुळे बाधित झालेल्या निकट सहवासितांची संख्या ४१ आहे.  आतापर्यंत मुंबई व अन्यत्र ये-जा करणारे रूग्ण व त्यांचे बाधीत निकट सहवासीत यांची एकूण संख्या १६२ झाली आहे. तर ८ जणांना डिस्चार्ज मिळाल्याने महापालिका क्षेत्रात आता डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या ८५ झाली आहे. डोंबिवली पूर्वेतील ६७ वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता ४ झाली आहे. तसेच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता २१६ झाली आहे.
आज आढळलेल्या २४ रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील ६, कल्याण पश्चिमेतील ४, डोंबिवली पूर्वेतील ७, डोंबिवली पश्चिमेतील ६ आणि मांडा टिटवाळा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.  आजच्या रुग्णांमध्ये कल्याण बाहेर मुंबई आणि नवी मुंबई येथे कामासाठी जाणारे १२ जण असून यामध्ये पोलीस कर्मचारी, रुग्णालयातील कर्मचारी, परिवहन सेवेतील कर्मचारी आदींचा समावेश आहे. तर १० जण हे कोरोना रुग्णांचे निकट सहवासित असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.