कल्याण डोंबिवलीमध्ये आज १५ नव्या रुग्णांची नोंद तर एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

कल्याण :कल्याण डोंबिवलीमध्ये आज कोरोनाचे नवीन १५ रुग्ण आढळले असून एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रातील एकुण रुग्णांची संख्या ३२१ झाली असुन ०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला

कल्याण :कल्याण डोंबिवलीमध्ये आज कोरोनाचे नवीन १५ रुग्ण आढळले असून एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रातील एकुण रुग्णांची संख्या ३२१ झाली असुन ०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात आता डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या ९१ झाली आहे. 

डोंबिवली पूर्वेतील एका ५६ वर्षीय कोरोना बाधित महिला रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता ५ झाली आहे. तसेच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२५ झाली आहे. मुंबई व अन्यत्र कर्तव्यासाठी ये-जा करणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३० असून त्यांच्यामुळे बाधित झालेल्या निकट सहवासितांची संख्या ४७ झाली आहे. आज आढळलेले कोरोनाबाधित निकट सहवासित हे यापूर्वी मुंबईला कर्तव्यासाठी ये-जा करणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णाचे निकट सहवासित आहेत.

आज आढळलेल्या नवीन १५ रूग्णांमध्ये ९ रुग्ण हे मुंबई आणि ठाणे येथील कर्मचारी असून उर्वरित ६ रुग्ण हे मुंबई येथे जाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचे निकट सहवासीत आहेत. यामध्ये कल्याण पूर्वेतील ७, कल्याण पश्चिमेतील २, डोंबिवली पूर्वेतील ३ आणि डोंबिवली पश्चिमेतील ३ रुग्णांचा समावेश असल्याची माहिती महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.