कल्याण डोंबिवलीत १२ रुग्णांची वाढ तर ९ रुग्णांना डिस्चार्ज, कोरोना रुग्णांची संख्या १८१

कल्याण : कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच असून आज नव्याने १२ रुग्णांची भर पडली आहे. तर ९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजच्या या रुग्णांमध्येदेखील मुंबईला अत्यावश्यक

कल्याण : कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच असून आज नव्याने १२ रुग्णांची भर पडली आहे. तर ९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजच्या या रुग्णांमध्येदेखील मुंबईला अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या ८ जणांचा समावेश आहे. त्यामुळे मुंबईला जाणारे हे कर्मचारी कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना घेऊन येत असल्याचे पुन्हा सिद्ध झालं आहे. आज मिळालेल्या १२ रूग्णांमुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या १८१ झाली आहे. यापैकी ३ जण मृत तर आतापर्यंत ६० जणांना डिस्चार्ज देण्यात आला असुन ११८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कल्याण पश्चिम मध्ये राहणारे ३५ वर्षीय पुरुष आणि कल्याण पूर्वेतील ३४ वर्षीय पुरुष हे दोघेही मुंबई येथील शासकीय रुग्णालयातील कर्मचारी  आहेत. मांडा टिटवाळा येथील ३२ वर्षीय पुरुष, कल्याण पश्चिमेतील ३३ वर्षीय पुरुष मुंबई येथील कर्मचारी, कल्याण पूर्वेतील ३६ वर्षीय पुरुष मुंबई येथील खाजगी कंपनीतील कर्मचारी, कल्याण पूर्वेतील ४८ वर्षीय पुरुष कोरोना बाधित रुग्णाचा सहवासीत, टिटवाळा पूर्वेतील ५० वर्षीय महिला, ३९ वर्षीय पुरुष मुंबई येथील पोलीस कर्मचारी, २९ वर्षीय महिला कोरोना बाधित रुग्णाची सहवासित,  डोंबिवली पूर्वेतील ३३ वर्षीय आणि ५३ वर्षीय पुरुष, तसेच कल्याण पश्चिमेतील ४३ वर्षीय पुरुष हे तिघेही मुंबई येथे कार्यरत आहेत. 

एकूण १६९ रुग्णांची वर्गवारी – कल्याण पूर्व ३७, कल्याण पश्चिम २४, डोंबिवली पूर्व ६१, डोंबिवली पश्चिम ४३, मांडा टिटवाळा १०,  मोहने ६