कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे २३ नवीन रुग्ण – एक महिन्याच्या चिमुकलीलाही कोरोनाची लागण

कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये आज कोरोनाचे २३ नवीन रुग्ण आढळले असून महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या ३४४ झाली आहे. आज १३ जणांना डिस्चार्जदेखील देण्यात आला असून एकूण डिस्चार्ज

कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये आज कोरोनाचे २३ नवीन रुग्ण आढळले असून महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या ३४४ झाली आहे. आज १३ जणांना डिस्चार्जदेखील देण्यात आला असून एकूण डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या १०४ झाली आहे. आज आढळलेल्या या २३ रुग्णांमध्ये डोंबिवली पश्चिमेतील १ महिन्यांच्या चिमुकलीचा आणि कल्याण पूर्वेतील लॉन्ड्रीच्या दुकानात काम करणाऱ्या २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर मुंबईला जाणाऱ्या ७ कर्मचाऱ्यांचा आणि मुंबई येथे जाणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांच्या १२ निकट सहवासीतांचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रातील एकुण रुग्णांची संख्या ३४४ झाली असुन १३ जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. महापालिका क्षेत्रात आता डिसचार्ज झालेल्या रुग्णांची संख्या १०४ झाली आहे. तर मृत रुग्णांची संख्या ५ तसेच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आता २३५ झाली आहे.

तसेच मुंबई व अन्यत्र कर्तव्यासाठी ये-जा करणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या १३७ असून त्यांच्यामुळे बाधित झालेल्या निकट सहवासितांची संख्या ५९ झाली असल्याने मुंबई व अन्यत्र ये-जा करणारे व त्यांचे कोरोनाबाधीत निकटसहवासीत यांची संख्या १९६ इतकी झाली आहे. आज आढळलेले कोरोना बाधित निकट सहवासीत हे यापूर्वी मुंबईला कर्तव्यासाठी ये जा करणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांचे निकट सहवासीत आहेत. आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील एकुण ३० टक्के कोरोनाबाधीत रूग्ण डिस्चार्ज झाले आहेत. आजच्या २३ रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील १३, कल्याण पश्चिमेतील ५, डोंबिवली पूर्वेतील १, डोंबिवली पश्चिमेतील ३ तर मांडा टिटवाळा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.