कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे २२ नवीन रुग्ण – कोरोना रुग्णांची संख्या ३६६ तर आतापर्यंत १३० रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे आज नवीन २२ रुग्ण आढळले असून महापालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३६६ झाली आहे. यापैकी ५ जण मृत आहेत. तर आतापर्यंत एकूण १३० जणांना

कल्याण :  कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोनाचे आज नवीन २२ रुग्ण आढळले असून महापालिका क्षेत्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ३६६ झाली आहे. यापैकी ५ जण मृत  आहेत. तर आतापर्यंत एकूण १३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध रुगालयात २३१ रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबई व अन्यत्र कर्तव्यासाठी ये-जा करणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या १४५ असून त्यांच्यामुळे बाधित झालेल्या निकट सहवासितांची संख्या ७३ झाली आहे. आज आढळलेले कोरोनाबाधित निकट सहवासीत हे यापूर्वी मुंबईला कर्तव्यासाठी ये-जा करणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांचे निकट सहवासित आहेत.

आज आढळलेल्या २२ रूग्णांपैकी ८ रुग्ण हे मुंबई आणि भिवंडी येथील कर्मचारी आहेत. यामध्ये मुंबई येथील शासकीय आणि खाजगी रुग्णालयातील कर्मचारी, मुंबई येथील पोलीस कर्मचारी, मुंबई येथील खाजगी बँकेतील वाईस प्रसिडेंट आणि कर्मचारी, भिवंडी येथील खाजगी कंपनीमधील कर्मचारी यांचा समावेश आहे. तर उर्वरित १४ रुग्ण हे मुंबई येथे जाणार्या कोरोना बाधित रुग्णाचा निकट सहवासीत आहेत. या २२ रूग्णांपैकी  कल्याण पूर्वेतील १२, कल्याण पश्चिमेतील ५, डोंबिवली पूर्वेतील २,डोंबिवली पश्चिमेतील २ तर मोहने येथील एका रुग्णाचा समावेश आहे.