कल्याण डोंबिवलीत कोरोनामुळे दोघांचा मृत्यू, आज आढळले नवे १८ रुग्ण – कोरोना रुग्णांची संख्या ३८५

कल्याण : कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण डोंबिवलीमध्ये घडली असून आज नवे १८ रुग्ण आढळले आहेत. यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या एकुण रुग्णांची संख्या ३८५ झाली असून मृत रुग्णांची

कल्याण : कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण डोंबिवलीमध्ये घडली असून आज नवे १८ रुग्ण आढळले आहेत. यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या एकुण रुग्णांची संख्या ३८५ झाली असून मृत रुग्णांची संख्या ७ झाली आहे. तर आतपर्यंत १३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून २४८ रुग्ण उपचार घेत आहेत. कल्याण पश्चिम मधील ५८ वर्षीय पुरुषाचा आणि डोंबिवली पूर्वेतील ४२ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज आढळलेल्या १८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील ७, कल्याण पश्चिमेतील १, डोंबिवली पूर्वेतील ५, डोंबिवली पश्चिमेतील ३, आंबिवलीतील १, मांडा टिटवाळा येथील १ या रूग्णांचा समावेश असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.