कल्याण डोंबिवलीमध्ये ६ रुग्णांची भर; एकाचा मृत्यू – कोरोना रुग्णांची संख्या ३९१

कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये आज कोरोनाचे नवे ६ रुग्ण आढळल्याने महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या ३९१ झाली आहे. तर या ६ रूग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. उपचार घेत

 कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये आज कोरोनाचे नवे ६ रुग्ण आढळल्याने महापालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या ३९१ झाली आहे. तर या ६ रूग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.  उपचार घेत असलेल्‍या रुग्‍णांची संख्‍या २४२ असून मृत रुग्‍णांची संख्‍या  ८ झाली आहे. आतापर्यंत एकूण १४१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आढळलेल्या ६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील २६ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष, ४२ वर्षीय पुरुष आणि ३५ वर्षीय पुरुष यांच्या समावेश असून यातील ३५ वर्षीय पुरुष रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर डोंबिवली पश्चिमेतील ४२ वर्षीय पुरुष आणि कल्याण पश्चिमेतील ४० वर्षीय महिलेचा देखील आजच्या रुग्णांमध्ये समावेश आहे. दरम्यान याआधी कोरोना रुग्ण हा कोणत्या ठिकाणी काम करणारा आहे याची माहिती पालिकेकडून देण्यात येत होती. मात्र काही दिवसांत कोरोना रुग्णांमध्ये मुंबईला कामाला जाणरे आणि त्यांच्या निकट सहवासितांना कोरोनाची जास्त लागण झाल्याचे समोर येत होते. यावर उपाय म्हणून पालिका आयुक्तांनी कल्याण डोंबिवली बाहेर कामाला जाणाऱ्यांना  पालिका क्षेत्रात नो एन्ट्रीचे आदेश काढले होते. मात्र राजकीय अथवा राज्य प्रशासनाच्या दबावाखाली हा निर्णय मागे घेतल्याची चर्चा रंगली असून आता देखील या रूग्णांपैकी मुंबई येथे जाणारे रुग्ण अथवा त्यांचे निकट सह्वासित यांची माहिती पालिकेकडून लपविण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.