कल्याण डोंबिवलीमध्ये आज ३५ रुग्ण आढळल्याने कोरोना रुग्णांची संख्या ४५९

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज एकाच दिवशी तब्बल ३५ रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून आज एकाच दिवशी तब्बल ३५ रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर आज एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या या ३५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने ४५९ चा आकडा गाठला आहे. यापैकी आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून १७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल २७२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज आढळलेल्या या ३५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील १४, कल्याण पश्चिमेतील ७, डोंबिवली पूर्वेतील ३, डोंबिवली पश्चिमेतील ८ आणि  टिटवाळा पूर्व येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. एकाच दिवशी एवढे रुग्ण आढळल्याने लॉकडाऊनचे नियम अधिक तीव्र करण्याची मागणी जाणकार व्यक्त करत आहेत.आज एकूण १०६ जणांचे स्वॅब घेण्यात आले. यामध्ये  शासकीय लॅबमध्ये ५८ तर खाजगी लॅब मध्ये ४८ स्वॅब घेण्यात आले आहेत. तर १८२ जणांचे स्वॅब अहवाल प्रलंबित आहेत.  आज ताप दवाखान्यात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या १९८ आहे.  कोरोनाबाबत सर्वेक्षण करण्यासाठी ९३८ सर्वेक्षण पथके कार्यरत असून आतापर्यंत कंटेनमेंट
 क्षेत्रातील १०३३५० घरांचे आणि ३९२३६७ लोकांचे सर्वेक्षण पूर्ण केले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.