कल्याण डोंबिवलीत ३० नवीन रुग्णांची वाढ – कोरोना रुग्णांची संख्या ५३०

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज दिवसभरात नवीन ३० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून, आजच्या या ३० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या ५३० झाली

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज दिवसभरात नवीन ३० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून, आजच्या या ३० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या ५३० झाली आहे. यापैकी आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून १९६  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ३२३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज आढळलेल्या या ३० रूग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील ८, कल्याण पश्चिमेतील ६, डोंबिवली पूर्वेतील ३, डोंबिवली पश्चिमेतील १२ आणि  आंबिवली  येथील १ रुग्णाचा समावेश आहे.

आज आढळलेले हे ३० रुग्ण कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी, विजय नगर, कोळसेवाडी, चक्की नाका, नांदीवली, गणेशवाडी, कल्याण पश्चिमेतील आदर्श कॉलनी, आधारवाडी, आधारवाडी जेल रोड, संतोषी माता मंदिर रोड,  डोंबिवली पूर्वेतील तुकाराम नगर आणि एम.आय.डी.सी परिसर, डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाण पाडा, शास्त्रीनगर, कोपरगाव, कोपर रोड, सुभाषरोड, ठाकूरवाडी, आनंदनगर आणि आंबिवली या परिसरात राहणारे आहेत.