कल्याण डोंबिवलीत २६ नवीन रुग्णांची वाढ, कोरोनामुळे तिघांचा मृत्यू –  कोरोना रुग्णांची संख्या ५९४

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज दिवसभरात नवीन २६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून, कोरोनामुळे ३ जणांच्या मृत्यू झाला आहे. आजच्या या २६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज दिवसभरात नवीन २६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून, कोरोनामुळे ३ जणांच्या मृत्यू झाला आहे. आजच्या या २६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या ५९४ झाली आहे. यापैकी आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून २२७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ३५२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज आढळलेल्या या २६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील २, कल्याण पश्चिमेतील ३, डोंबिवली पूर्वेतील ११, डोंबिवली पश्चिमेतील ७,  आंबिवली २ तर टिटवाळा  येथील १ रुग्णाचा समावेश आहे. तर आज झालेल्या  तीन मृत्यू पैकी एन.आर.सी. कॉलनी मोहने आंबिवली येथील ३९ वर्षीय महिलेचा, डोंबिवली पश्चिमेतील जोंधळे स्कुल जवळील ७० वर्षीय पुरुषाचा तर कल्याण पश्चिमेतील ८७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज आढळलेले हे रुग्ण कल्याण पूर्वेतील नांदीवली, जिम्मीबाग, कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज, वायले नगर, गंधारे, डोंबिवली पूर्वेतील रामनगर, देसलेपाडा, आजदेपाडा, मानपाडा रोड, चोळेगाव,खंबाळपाडा, संत नामदेव पथ, डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर, गरीबाचा वाडा, देवीचा पाडा, जोंधळे स्कुल जवळ, आंबिवली येथील एन. आर.सी. कॉलनी मोहने, टिटवाळा पूर्वेतील उमिया कॉम्प्लेक्स या परिसरातील आहेत.