कल्याण डोंबिवलीतील खड्डे बुजविण्याची नगरसेवक कुणाल पाटील यांनी आयुक्तांकडे केली मागणी

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांना पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी नगरसेवक कुणाल पाटील यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका महापालिका

 कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यांना पडलेले खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी नगरसेवक कुणाल पाटील यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका महापालिका हद्दीतील अनेक रस्त्यांवर खड्डे पडल्याचे दिसून येत आहे. खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जाऊ शकतो. असे असताना महापालिका प्रशासन ग्रामीण भागात तसेच एमआयडीसी परिसरात खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करत आहे. मनपा दरवर्षी नागरिकांकडून मालमत्ता करापोटी कोट्यवधींची वसुली करते. मात्र खड्डेमुक्त रस्तेच होत नसल्याने सर्वसामान्य नागरिक अपघातांचे बळी पडताना दिसतात. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या २७ गावातील देखील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. कोरोनाच्या संकट काळात नागरिकांना चांगले रस्ते देण्याची मागणी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेतील रुग्णवाहिकांना किंवा अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर करण्यात रस्त्यावरील खड्डे कारणीभूत ठरत आहेत.त्यामुळे यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी, नगरसेवक कुणाल पाटील यांनी मनपा आयुक्त  डॉ. विजय सुर्यवंशी यांच्याकडे केली आहे.