कल्याण डोंबिवलीमध्ये ६ महिन्यांच्या चिमुकलीला कोरोनाची लागण, शहरात ७ रुग्णांची नोंद झाल्यानंतर ८५ जण कोरोनाग्रस्त

कल्याण : कल्याण डोंबिवलीमधील कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होण्याचे चिन्ह दिसत नसून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. डोंबिवली पश्चिमेतील एका ६ महिन्यांच्या चिमुकलीला

 कल्याण : कल्याण डोंबिवलीमधील कोरोना रुग्णांची संख्या काही केल्या कमी होण्याचे चिन्ह दिसत नसून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. डोंबिवली पश्चिमेतील एका ६ महिन्यांच्या चिमुकलीला कोरोनाची लागण झाली असून गेल्या २४ तासांत कल्याण पूर्व आणि डोंबिवली पश्चिममध्ये कोरोनाचे ७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या ८५ झाली आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असून नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आज आढळलेल्या ७ नवीन रुग्णांमध्ये डोंबिवली पश्चिमेतील ६ महिन्यांच्या चिमुकलीसह ३५ वर्षीय महिला, ६२ वर्षीय पुरुष आणि ५३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर कल्याण पूर्वेतील ३० वर्षीय, २५ वर्षीय आणि ४८ वर्षीय या तिन्ही महिलांना कोरोनाची लागण झाली आहे. महापालिका क्षेत्रातील एकुण ८५ रुग्णांपैकी ३ जण मयत, तर २९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून ५३ रुग्ण उपचार घेत आहेत.