कल्याण डोंबिवलीत ३८ नवीन रुग्ण, कोरोनामुळे ४ रुग्णांचा मृत्यू – कोरोना रुग्णांची संख्या ८०४

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या २४ तासांमध्ये ३८ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या या ३८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या २४ तासांमध्ये ३८ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर ४ जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या या ३८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या  ८०४ झाली आहे. यापैकी आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून २७२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ५१० रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज आढळलेल्या या ३८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील ४, कल्याण पश्चिमेतील ३, डोंबिवली पूर्वेतील ७, डोंबिवली पश्चिमेतील ७, आंबिवलीतील ५, तर टिटवाळा येथील तब्बल १२  रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णांमध्ये १९ पुरुष, १३ महिला, ४ मुलं आणि  २ मुलींचा समावेश आहे. तर मयत झालेल्या ४ रुग्णांमध्ये कल्याण पश्चिमेतील ८३ वर्षीय महिला, कोळसेवाडी येथील ६९ वर्षीय पुरुष, कल्याण पूर्वेतील जरीमरी मंदिरा जवळील ५५ वर्षीय पुरुष आणि नांदिवली येथील ५९ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.