कल्याण डोंबिवलीत २१ नवीन रुग्ण – कोरोनामुळे ७० वर्षीय महिलेचा मृत्यू, कोरोना रुग्णांची संख्या ८२५

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासांत २१ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. आजच्या या २१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासांत २१ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर एका ७० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. आजच्या या २१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या ८२५ झाली आहे. यापैकी आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला असून २८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ५२२ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज आढळलेल्या या २१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील ६, कल्याण पश्चिमेतील ४, डोंबिवली पूर्वेतील ४, डोंबिवली पश्चिमेतील ६, तर आंबिवलीतील  एका रुग्णाचा समावेश आहे. आजच्या रुग्णांमध्ये ११ पुरुष, ८ महिला आणि २ मुलींचा समावेश आहे. तर मयत झालेल्यामध्ये कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी येथील ७० वर्षीय महिला यांचा समावेश आहे.

आजचे हे रुग्ण कल्याण पूर्वेतील  केबिन रोड, परशुराम वाडी, खडेगोळवली, नांदिवली, हाजी मलंग रोड, कल्याण पश्चिमेतील वायले नगर, गोकुळ नगरी, गोविंदवाडी, मंगेशी ड्रीम सिटी, डोंबिवली पूर्वेतील सागर्ली, सोनारपाडा, आजदे, जिमखाना रोड, डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोड, सुभाष रोड, गोपीनाथ चौक, मोठा गाव, उमेश नगर, गरीबाचा वाडा, आंबिवलीतील दत्त मंदिर या परिसरातील आहेत..