कल्याण डोंबिवलीत २९ नवीन रुग्ण,एकाचा मृत्यू – कोरोना रुग्णांची संख्या ९११

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात २९ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर एक जणाचा मृत्यू झाला आहे. आजच्या या २९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना

 कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात २९ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर एक जणाचा मृत्यू झाला आहे. आजच्या या २९   रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या ९११ झाली आहे. यापैकी आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला असून २९७  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ५८७  रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज आढळलेल्या या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील १२, कल्याण पश्चिमेतील १, डोंबिवली पूर्वेतील ११, डोंबिवली पश्चिमेतील ३, ठाकुर्लीतील १ आणि आंबिवलीतील १ रुग्ण आहे. यामध्ये २० पुरुष तर ९ महिलांचा समावेश आहे. कल्याण पूर्वेतील शिवाजी कॉलनी येथील ५२ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजचे हे रुग्ण कल्याण पूर्वेतील पिसवली, शिवाजी कॉलनी, परशुराम वाडी, गणेशवाडी, खडेगोळवली, कर्पेवाडी, भगवान नगर, काटेमानिवली, चेतना शाळेजवळ, चिंचपाडा रोड, कल्याण पश्चिमेतील आधारवाडी, डोंबिवली पूर्वेतील पाथर्ली, सुनील नगर, खंबाळपाडा, पेंडसे नगर, मानपाडा रोड, तुकाराम नगर, डोंबिवली पश्चिमेतील दीनदयाळ क्रॉसरोड, शास्त्रीनगर, राजू नगर, ठाकुर्लीतील चोळेगाव आणि आंबिवली येथील अटाळी या परिसरातील आहेत.