कल्याण पूर्वेत कोरोनाचा कहर- एकाच दिवशी आढळले २४ रुग्ण तर एकाचा मृत्यू

कल्याण : कल्याण पूर्वेत कोरोनाने कहर केला असून एकाच दिवशी तब्बल २४ रुग्णांची नोंद या ठिकाणी करण्यात आली आहे. यापैकी एकाचा मृत्यू देखील झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४

 कल्याण : कल्याण पूर्वेत कोरोनाने कहर केला असून एकाच दिवशी तब्बल २४ रुग्णांची नोंद या ठिकाणी करण्यात आली आहे. यापैकी एकाचा मृत्यू देखील झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ३८  नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजच्या या ३८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या  ९८०  झाली आहे. यापैकी आतापर्यंत २८  जणांचा मृत्यू झाला असून ३३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ६१८  रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज आढळलेल्या या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील २४, कल्याण पश्चिमेतील ५, डोंबिवली पूर्वेतील ९ रुग्ण आहे. यामध्ये १६ पुरुष तर १३ महिला, ७ मुलं, २ मुलींचा समावेश आहे. कल्याण पूर्वेतील नेतिवली येथे राहणाऱ्या ४६ वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजचे हे रुग्ण कल्याण पूर्वेतील काटेमानिवली, चिंचपाडा, कोळसेवाडी, कर्पेवाडी, परशुरामवाडी, विट्ठलवाडी, नेतिवली, कल्याण पश्चिमेतील आनंदनगर, जोशीबाग, आंबेडकररोड, डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड तुकाराम नगर, टिळक कॉलेज जवळ आजदे, मानपाडा, मातोश्री शाळेजवळ आजदे  या परिसरातील आहेत.