कल्याण डोंबिवलीत दिवसभरात ७१ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला असून आज एकाच दिवशी तब्बल ७१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका

 कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला असून आज एकाच दिवशी तब्बल ७१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील २४ तासात ७१ नवीन रुग्णांची भर पडली आहे. आजच्या या ७१  रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांची  संख्या  ११६७ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू झाला असून ५६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ५६८  रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.

आज आढळलेल्या या रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील २२, कल्याण पश्चिमेतील २०, डोंबिवली पूर्वेतील १३, डोंबिवली पश्चिमेतील १०, ठाकुर्लीतील १, आंबिवलीतील २ तर टिटवाळा येथील ३  रुग्ण आहेत. यामध्ये ४० पुरुष, २३ महिला, ६ मुलं आणि २ मुलींचा समावेश आहे. तर कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी येथील ६५ वर्षीय महिलेचा आणि डोंबिवली पश्चिमेतील सुभाष नगर येथील ५० वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजचे हे रुग्ण कल्याण पूर्वेतील दुर्गा शाळेजवळ, चिंचपाडा रोड, एफ. केबिन रोड, शक्तीधाम रोड, सिद्धार्थ नगर, हाजी मलंग रोड, नांदिवली, गावदेवी मंदिर, मिलिंद नगर, पिसवली, गवळी नगर, कोळसेवाडी, कर्पेवाडी, कल्याण पश्चिमेतील वायले नगर, म्हसोबा मैदाना जवळ, बेतूरकर चौक, गंधार नगर, अन्सारी चौक, बेतूरकर पाडा, रामबाग लेन नं. ४, आधारवाडी, रेतीबंदर रोड, गंधारे रोड, मौलवी कंपाउंड, कमला मोटर्सच्या मागे, रोहिदास वाडा, जोशी बाग, बैल बाजार, आधारवाडी रोड, डोंबिवली पूर्वेतील आजदे गाव, आजदे, देसले पाडा, सागर्ली, टिळक नगर, आयरे रोड, मढवी शाळेजवळ, डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रोड, देवी चौक, कोपर रोड, वैभव मंगल कार्यालयामागे, नेमाडे रोड, अंबा माता मंदिराजवळ,  ठाकुर्लीपूर्वेतील मराठी शाळेजवळ, आंबिवलीतील अटाळी, गणेश नगर, टिटवाळ्यातील उंबार्णी रोड मांडा, मांडा टिटवाळा, गणेशवाडी या परिसरातील आहेत.