कल्याण डोंबिवलीमध्ये ४६२ नवे कोरोना रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू

कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच असून आज कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. आज एकाच दिवशी तब्बल ४६२ नवे रुग्ण आणि ७ जणांचा मृत्यू झाल्याने कल्याण डोंबिवलीची

 कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच असून आज कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. आज एकाच दिवशी तब्बल ४६२ नवे रुग्ण आणि ७ जणांचा मृत्यू झाल्याने कल्याण डोंबिवलीची अवस्था वुहान शहरासारखी होते की काय अशी भीती नागरिकांना वाटत आहे. आजच्या या ४६२ रुग्णांमुळे कोरोना रुग्णांची संख्या  ६५७५ झाली आहे. या ६५७५ रुग्णांमध्ये ४०६६ रूग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून एकूण २३८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १२० जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.