कल्याण- डोंबिवलीमध्ये आज १३ रुग्णांची नोंद झाल्याने शहरात ७३ कोरोनाबाधित

कल्याण : गेल्या काही दिवसांमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत होती. मात्र आज ही संख्या अचानक वाढली असून आज कल्याण डोंबिवलीमध्ये १३ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

कल्याण :  गेल्या काही दिवसांमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत होती. मात्र आज ही संख्या अचानक वाढली असून आज कल्याण डोंबिवलीमध्ये १३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यात कल्याणमधील १ रुग्ण तर उर्वरित १२ रुग्ण हे डोंबिवलीमधील असून यामध्ये १ वर्षीय मुलीचा समावेश आहे. यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ७३ झाली आहे. २६ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज भेटला आहे. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ४५  रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज नोंद झालेले  सर्व रुग्ण कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आले आहेत. तर कल्याणमधील ६५ वर्षीय पुरुष हा कल्याण पश्चिमचा रहिवासी असून ते परदेशवारी करून आलेले आहत. त्यामुळे आत्तापर्यंत महापालिका क्षेत्रातील एकुण ७३ रुग्ण असून या रुग्णांपैकी – २  मृत तसेच २६ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून ४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये १३ नवीन कोरोना संक्रमित रुग्ण सापडले आहेत. ही बाब खुप गंभीर असुन, नागरिकांनी लाॅकडाऊनचे काटेकोर पालन करणे ही काळाची गरज बनली आहे. एकाच दिवसात १३ नवीन लोकांना कोरोना संक्रमण होण्याचे एकमेव कारण काही नागरिक शुल्लक कामाच्या बहाण्याने विनाकारण शहर फिरणयास घराबाहेर पडत आहेत. तसेच लोक भाजीपाला घेण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता बेशिस्तपणे गर्दी करत आहेत. हे चुकीचे आहे.