कल्याण डोंबिवलीमध्ये आज ३ रुग्णांची नोंद झाल्यानंतर शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११७

कल्याण : कल्याण डोंबिवली परिसरात आज कोरोनाचे ३ नवीन रुग्ण आढळले असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ११७ झाली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना विषाणूचा

 कल्याण : कल्याण डोंबिवली परिसरात आज कोरोनाचे ३ नवीन रुग्ण आढळले असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ११७ झाली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज आढळलेल्या ३ रुग्णांमध्ये  डोंबिवली पूर्वेतील एक ६१ वर्षीय पुरुष हा  कोरोनाबाधित रूग्णाचा निकट सहवासीत,  कल्याण पुर्वेतील एक ३३वर्षीय पुरुष- मुंबई येथील पोलीस तसेच एक महिला ३२ वर्षे (मांडा – टिटवाळा) शासकीय रुग्णालयातील स्टाफ नर्स अशा एकुण ३ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. कल्याण डोंबिवली  महापालिका क्षेत्रातील एकुण रुग्ण ११७ आहेत तर या रुग्णांपैकी – ३ मृत आणि ३९ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच उपचार घेत असलेले रूग्ण ७५ आहेत.